मेष- नवं दुकान, प्रॉपर्टी किंवा ऑफिस खरेदी करण्याची इच्छा होऊ शकते. व्यवसायाच्या निमित्ताने परदेस दौऱ्याची शक्यता. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांनी पुढे जाण्यासाठी कोणा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा, फायद्याचा ठरेल. तुमचा साथीदार छान भेट वस्तू देईल. प्रेमसंबंध आणखी दृढ होतील. कोणत्याही बाबतीत भावूक होऊ नका. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- आजचा दिवस आळसावलेला असेल. विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीशी मतभेदांची शक्यता. कामाच्या बाबतीत कोणतीच साशंकता मनी बाळगू नका. आजच्या दिवशी स्वत:च्याच कामाची तपासणी करा. आपले बेत एकदा पडताळून पाहा. कोणा एका खास व्यक्तीविषयी खूप काही माहिती मिळण्याची शक्यता. जुन्या गोष्टींमध्ये सुधारणा होत, संपत्तीच्या कामांना अधिक प्राधान्य द्याल. गरजेनुसार पैशांची व्यवस्था होईल. साथीदगाराची वागणूक चिंता देऊ शकते. विवाहितांसाठी आजचा शुभ दिवस. 


मिथुन-व्यवसायासंबंधीच्या निर्णयासाठी मित्रांची मदत मिळेत. आपल्या क्षेत्रात यश संपादन कराल. अपूर्ण कामं मार्गी लागतील. प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस शुभ. जुन्या गोष्टी मागे सारण्याचा प्रयत्न करा, सर्वकाही ठीक होईल. लहानशा गोष्टींवर चीडलात तर मात्र गोष्टी बिघडतील. 


कर्क- दैनंदिन कामांमध्ये आज तुम्ही रमणार नाही. मनात येणारे काही विचार तुम्हाला खिन्न करतील. भावना आणि रागावर ताबा ठेवा. अतिउत्साहीपणा आणि घाईमुळे काही गोष्टी बिघडू शकतात. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत घ्यावी लागेल. खाण्याच्या बाबतीत थोडं दुर्लक्ष होईल. कोणतंही काम पूर्णत्वास नेणार तितकच यश तुमच्या वाट्याला येणार. प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस चांगला. 


सिंह- कामाच्या ठिकाणी गरज नसलेल्या वादांपासून दूर राहा. वरिष्ठांना तुमच्या कामाने आनंद होईल. सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. काही मोठे आर्थिक निर्णय घेण्याची शक्यता. व्यवसायामध्ये काही महत्त्वाचे निर्णय होणार. पण, काही बाबतीत मात्र तडजोड करावी लागेल. महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या. 


कन्या- नोकरीमध्ये नको त्या कामांमध्ये गुंतून राहाल. चांगल्या परिणामांसाठी बरीच मेहनत करण्याची आवश्यकता. नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर जरा सांभाळून, आज हा विचार नको. लहानमोठ्या वादांनी निराश व्हाल. आपल्या मनातील कोणतीच गोष्ट कोणाकडे व्यक्त करु नका. महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या. आरोग्याकडे लक्ष द्या. 


तूळ- व्यवसायात फायदा होईल. कामाच्या ठिकाणी अनेक गोष्टी तुमच्या इच्छेनुसार होतील. मेहनत करावीच लागेल, दिवश शुभ आहे. इतरांना मदत कराल तितकाच तुमचाही फायदा होईल. नव्या योजना आखाल. प्रेम संबंधांमध्ये चढ-उतार अपेक्षित. प्रेम करण्यारी व्यक्ती तुम्हाला कोणा एका बाबतीत नाराज करु शकते. विवाहितांना साथीदाराची मदत लाभेल. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा नको. 


वृश्चिक- जास्त मेहमत करण्यासाठी तयार राहा. कामाचे व्याप वाढतील. प्रेम व्यक्त करण्यात संकोचलेपणा नको. वाहन चालकांनी सावधगिरी बाळगा. नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत फुकाचा खर्च आणि तणाव याला सामोरं जावं लागेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या योगदानाची नोंद घेण्यात येईल. साथीदाराच्या भावनांना महत्त्वं द्या.


धनु- संपूर्ण दिवस तुम्ही व्यक्त व्हाल. वरिष्ठ तुमच्या विचारांना महत्त्वं देतील. कामाच्या ठिकाणी आदर मिळेल. जास्त मेहनत करा, यश तुमचच आहे. कार्यक्षमता वाढेल, आरोग्य सुधारेल. 
मकर- व्यवसायात प्रगती होईल. कनिष्ठ तुमची मदत करतील. ताण देण्याच्या गोष्टी निकालात निघतील. व्यवसायामघ्ये फायद्याचे करार होण्यची शक्यता. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. व्यग्र दिवसामुळे थकवा येऊ शकतो. आरामही तितकाच महत्त्वाचा. 


कुंभ - वेळ तुमच्या पारड्यात आहे. व्यवसायामध्ये प्रगती आहे. नव्या कामाच्या ठिकाणी मुलाखती गेलात तर फायदा होण्याची शक्यता. चांगल्या संधी तुमच्यापुढे चालून येतील. वरिष्ठांसोबतची समीकरणं सुधारतील. नवीन भेटीगाठी होतील. तुमच्या व्यक्तीमत्वाने इतरांवर सकारात्मक प्रभाव पडेल. लोकांकडून तुमच्या मनीच्या गोष्टी होकारात बदलण्याची शक्यता. 
मीन- व्यवसायात फायदा. बदलीची बातमी मिळण्याची शक्यता. नोकरी आणि व्यवसायात आर्थिक गुंता वाढू शकतो. ताण वाढेल. महत्त्वाचं काम पूर्ण करण्याचं राहून जाईल. जुने मित्र अचानक भेटतील. काही कामांमध्ये त्यांचीच मदत होईल. गरज लागेल तिथे तडजोडीसाठी तयार राहा.   


मीन- जोडीदार आणि कुटुंबीयांसोबत चांगला वेळ घालवाल. बऱ्याच काळापासून प्रतीक्षा असलेले लोक भेटतील. एखाद्या प्रसंगामुळे विचार करायला प्रवृत्त व्हाल. आर्थिक लाभ किंवा नोकरीत बढती मिळण्याची शक्यता.