मेष - आज कोणत्याही कामाकडे दुर्लक्ष करू नका. नोकरी किंवा व्यवसायतील सर्व टार्गेट वेळेत पूर्ण करा. एकाग्रताने काम करा. नव्या ओळखी होतील. आर्थिक समस्यांचं निराकरण होईल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ - आजचा दिवस उत्तम असेल. नव्या संधी मिळतील. व्यवसायात यश मिळेल. सकारात्मक दृष्टीनं विचार करा. नव्या व्यक्तींसोबत भेटी होतील. आरोग्याकडे लक्ष द्या.  


मिथुन - घाईगडबडीत कोणतंही काम करू नका. पैशांची स्थिती अतिशय चिंताजनक असेल. नोकरी आणि बिझनेसमध्ये चांगली प्रगती होईल. तणावाच वातावरण असेल. मित्रपरिवाराच्या फुकटच्या अडचणीत अडकण्याची शक्यता आहे. 


कर्क - जुन्या कामांपासून फायदा होण्याची शक्यता आहे. जुने मित्र अचानक कामी येतील. दिवस चांगला आहे. मेहनतीचं फळ लाभधारक ठरेल. जीवनसाथीकडून मदत मिळेल. 


सिंह - कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. पुढे जाण्याचा मार्ग सापडेल. अधिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. लोकांच्या समस्यासोडवण्यात तुमचा खारीचा वाटा असेल. 


कन्या - कामकाजात वाढ होईल. सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. नियमित कामांकडे लक्ष द्या. डोक्यावरच्या अनेक जबाबदाऱ्या आज कमी होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस थकवणारा आहे. आरामाची अत्यंत गरज आहे. कुटुंबाकडे विशेषतः आई-वडिलांकडे लक्ष द्या. त्यांच आरोग्य सांभाळा. 


तूळ - कुटुंबात सुख-शांती वाढेल. कार्यक्षेत्रात नवीन अॅग्रीमेंट आणि सामाजिक कामात लक्ष द्याल. जुन्या मित्रांशी गाठीभेटी होतील. ऑफिसमध्ये थोडो तणाव जाणवेल. पार्टनरकडून आर्थिक मदत होतील. कामातून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न कराल. 


वृश्चिक - रखडलेली काम आज पूर्ण होणार त्यामुळे कामाचा ताण कमी होणार. निर्णय खूप विचारपूर्वक घ्या. पैशांची स्थिती बदलणार आहे. कुटुंबासोबत प्रवासाचा योग आहे. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल. 


धनू- धनू राशीच्या लोकांना आजचा दिवस खूप छान असेल. धनलाभ होणाऱ्या राशींमध्ये धनू या राशीचा क्रमांक आहे. नवीन वर्षांतला आजचा पहिला शनिवार असेल जो तुम्ही आनंदाने घालवाल. कामात लक्ष द्या. नवीन गोष्टी घडणार आहेत. त्याच्या स्वागतासाठी तयार राहा. 


मकर - आजच्या दिवशी आजूबाजूला लोकांकडून मदत मिळेल. ही मदत येणाऱ्या काळासाठी अत्यंत गरजेची आहे. कामात लक्ष द्या. कुटुंबासोबत मेजवानीचा प्लान कराल. मुलांसाठी विशेष वेळ काढा. त्यांच्यासोबत आऊटिंगचा प्लान कराल. 


कुंभ - धनलाभ होणाऱ्या राशींमध्ये कुंभचा देखील समावेश आहे. या राशींच्या लोकांनी आजचा दिवस शांत राहणंच योग्य आहे. काही वेळा शांतताच बरंच काही बोलून जाते. शब्दाने वाद करू नका. कामाकडे लक्ष द्या. 


मीन - बिझनेसमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. आजचा दिवस महत्वाचा आहे. जुन्या व्यक्तींसोबत गाठीभेटी होतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. अविवाहितांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे.