मेष- जर तुम्ही कोणत्या निर्णयाची प्रतिक्षा करत असाल तर थोडं शांत घ्या. सर्वकाही ठिक होईल. ऑफिसमध्ये रोजच्या कामापेक्षा काही वोगळं करण्याचा प्रयत्न करा. मेहनतीचं फळ चांगलं मिळेल. अचानक फायदा होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे विषेश लक्ष द्या.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- विचाराधीन कामं पूर्ण होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. विचार करण्याची पद्धत बदला. बेत आखण्याचा फायदा मिळेल. साथीदाराची साथ मिळेल. 


मिथुन- अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. आरोग्याची अधिक काळजी कराल. खाण्यापिण्याच्या बाबतीत सावध राहा. 


कर्क- कामाच्या ठिकाणी वातावरण चांगलं नसल्यामुळे मन चिंतीत राहील. प्रेमसंबंधांमध्ये तणाव असेल. प्रिस्पर्ध्यांपासून सावध राहा. 


सिंह- तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. आज तुम्ही इतरांपासून अधिक प्रभावित असाल. तुमचा सल्ला अनेकांसाठी फायद्याचा असेल. सांधेदुखी बळावेल. 


कन्या- कुटुंबाची मदत मिळेल. मानसिक परिस्थिती संतुलित असेल ज्याचा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर नियंत्रण ठेवा. आरोग्य उत्तम असेल. अडचणी दूर होतील. 


तुळ- तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. कामाच्या व्यापात बढती मिळण्याची संधी आहे. इतरांकडून काम करवून घ्याल. आजचा दिवस चांगला असेल. 


वृश्चिक - आर्थिक बाबतीत नुकसान होईल. काही कायदेशीर गोष्टींमध्ये अडकून राहाल. अचानक होणारी घटना तुम्हाला आनंद देऊन जाईल. सोबतच एखादी शुभवार्ता कळेल. 


धनु- शेअर बाजारात विचापूर्वक गुंतवणूक करा. वरिष्ठांसोबत थोडं सावधगिरीने बोला. एखादं खास काम पूर्ण होईल. दिवस शांततापूर्ण असेल. 


मकर- तुमचं काही बाबतीत नुकसान होईल. दिखाव्यापासून दूर राहा. कुटुंबात आर्थिक कारणांवरुन काही अडचणी येतील. जास्तीची जबाबदारी मिळेल. 


कुंभ- करिअरच्या दृष्टीने एखादी चांगली संधी मिळेल. शत्रूंवर तुमचं वर्चस्व असेल. काही गोष्टींमध्ये तुम्ही अडकाल. आरोग्याची काळजी घ्या. आज नव्या लोकांना भेटण्याचा योग आहे. 


मीन- करिअरच्या दृष्टीने काही संवेदनशील निर्णय घ्याल. विचारपूर्वक गुंतवणूक करा. आज गरजेपेक्षा जास्त थकवा येईल. आरोग्याची काळजी घ्या.