मेष- अडचणींमधून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. कामात मन लागेल. सकारात्मक राहा. मनात आलेली गोष्ट तात्काळ सत्यात उतरवा यश मिळेल. परंतु काही करण्याआधी विचार नक्की करा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- दिवस चांगला आहे, कौटुंबिक आनंद मिळेल. वेळ द्या प्रत्येक गोष्ट मार्गी लागेल. मित्रांसोबत वेळ व्यतीत कराल. रखडलेली कामे साथीदाराच्या मदतीने पूर्ण होतील. उत्पन्न आणि खर्च सम प्रमाणात राहील. 


मिथुन- मित्र आणि भावंडांकडून मदत मिळेल. अचानक कोणतही खास काम हाती लागू शकतं. आज होणारे बहुतांश निर्णय तुमच्या बाजूने असतील. वरीष्ठ तुमच्या कामामुळे खुश राहतील. 


कर्क- प्रचंड उत्साही असाल. एका महत्त्वाच्या जबाबदारीकडे विषेश लक्ष द्याल. व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न कराल. जुने काम देखील आज मार्गी लागेल. विवाहाचा प्रस्ताव येवू शकतो. 


सिंह- कामाच्या जागी मोठ्या कामाचा परिणाम होऊ शकतो. नवीन प्रेम प्रकरण सुरू होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांना भेटाल. प्रवासाचे योग आहेत 


कन्या - जुन्या गोष्टीकडे स्वतःला आकर्षित होताना पाहाल. एका व्यक्तीमुळे जुन्या सर्व गोष्टी पुन्हा ताज्या होतील. कामाच्या ठिकाणी थोडा आराम असेल. त्यामुळे मनातून एक शांतता अनुभवाल. स्वतःसाठी फक्त स्वतःसाठी वेळ घालवाल. 


तूळ - स्वप्नांचा विचार कराल. ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनापासून केलेले प्रयत्न यशस्वी होताना दिसतील. आजचा दिवस तुमच्यासाठी खास असेल. जवळच्या प्रिय व्यक्तीसोबत क्वालिटी टाईम घालवाल. यामुले कामाचा ताण तरी जाईलच पण पुढच्या कामांसाठी सज्ज व्हाल. 


वृश्चिक - जोडीदाराची कमतरता जाणवेल. म्हणून घाई करू नका. प्रेमात पडण्यासाठी घाई करू नका. काही नाती हळूवार समोर येतील. त्याचा आनंद वेगळा असेल. या सगळ्या भावनांसोबत थोडा वेळ कामात जाईल. आरोग्य सांभाळा. मनस्थिती सांभाळा. 


धनू - आज तुम्हाला अनुशासनची गरज आहे. मग ते अनुशासन कामाप्रती किंवा सवयींकरता का असेना पण ते लावणं गरजेचं आहे. नियमाने जगणं काहीरित्या चांगल असतं. आर्थिक बाबी सांभाळा. 


मकर - प्रेमात असाल तर आज जरा सावधान वाद होण्याची शक्यता आहे. नवीन लग्न झाल्यांनी देखील याची काळजी घ्याल. वृद्धांच्या आरोग्यात जरा चढ-उतार जाणवेल. लहान मुलांकडून कळत नकळत अनेक गोष्टी शिकतील. 


कुंभ - आज अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. पण सगळ्यागोष्टी थोड्यावेळाने सुरळीत होतील. त्यामुळे ताण घेऊ नका. पण लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी करा. कामात चोख रहा. संध्याकाळनंतर आनंदी दिवस आहे. 


मीन - कुटुंबात अतिशय चांगला वेळ घालवाल. काही गोष्टींचा ताण वाटेल पण तुमचा सकारात्मक विचार त्या गोष्टी सहज सोप्या करेल. काही लोकांकडे दुर्लक्ष करण्यातच खरा शहाणपण आहे. कामात आनंद मिळेल.