आजचे राशीभविष्य | रविवार | १६ जून २०१९
कसा असेल तुमचा आजचा दिवस
मेष - कामासह जबाबदारीही वाढेल. दिवसभर व्यस्त राहाल. व्यवसायातील समस्या समजुतीने सोडवाल. यश मिळेल. ऑफिसमध्ये शांती राहील. प्रवासाचा योग आहे.
वृषभ - जुन्या समस्या मार्गी लागतील. स्वत:कडे लक्ष द्या. नवीन कपड्यांची खरेदी होऊ शकते. नवीन कल्पना सुचतील. उत्पन्न आणि खर्चाकडे लक्ष द्यावे लागेल. मित्रांची मदत मिळेल.
मिथुन - धनलाभ होऊ शकतो. अनेक काळापर्यंत चालणाऱ्या कामाचा फायदा होईल. अविवाहितांचे लग्न जमण्याची शक्यता आहे. तुमच्या बुद्धीने कामं पूर्ण कराल. मित्र, परिवाराकडून मदत मिळेल. चांगली बातमी मिळेल. बेरोजगार लोकांसाठी दिवस चांगला आहे.
कर्क - अचानक धनलाभ होऊ शकतो. रखडलेले पैसे मिळतील. पैशांच्या समस्या सुटतील. कामासंबंधी चांगल्या कल्पना येतील. व्यवहारकुशलता आणि सहनशक्तीने काम कराल तर अनेक काम स्वत:हून मार्गी लागतील.
सिंह - आर्थिक स्थितीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आनंदी राहाल. महत्वाकांक्षा वाढेल. व्यवसायासाठी यात्रा करावी लागू शकते. अधिकारी तुमच्यावर खुश राहतील. मेहनतीने काही महत्वाची कामं पूर्ण कराल.
कन्या - कामात नवीन प्रयोग केल्यास त्यात यश मिळेल. दिवस चांगला आहे. विचार केलेल्या कामात सफल व्हाल. जोडीदारासोबत दिवस घालवाल. जुनी कामं वेळेत पूर्ण होतील. कौटुंबिक समस्या सुटतील.
तुळ - विचार करत असलेल्या कामाची सुरुवात करा. दिवस चांगला आहे. सामाजिक कामासाठी दिवस चांगला आहे. मित्रांसोबत वेळ जाईल. धनलाभ होऊ शकतो. ऑफिस, व्यवसायासाठी घेतलेले निर्णय फायद्याचे ठरतील.
वृश्चिक - दिवस खास आहे. येणाऱ्या पुढील दिवसांमध्ये फायदा होईल अशा काही गोष्टी समोर येतील. समस्या सोडवण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या समजूतदारपणाचा वापर करा. जुन्या आजारात आराम मिळेल. नशिबाची साथ मिळेल.
धनु - नोकरी, करियर, पैशांसंबंधी दिवस चागंला आहे. नवीन नोकरी किंवा बढतीच्या प्रयत्नांत असाल तर यश मिळेल. उत्साही राहाल. नवीन लोकांशी ओळखी होतील. अनेक लोक तुमच्या मतांशी सहमत असतील.
मकर - महत्त्वाचं काम करु शकता. मोठा फायदा होऊ शकतो. नवीन कामाची सुरुवात करण्यापेक्षा जुनी कामं पूर्ण करा. अविवाहितांसाठी दिवस चांगला आहे.
कुंभ - दिवसभर पैशांसंबंधी विचार येतील. प्रॉप्रर्टीच्या कामात धनलाभ होऊ शकतो. दररोजच्या कामात वाढ होईल. पुढे जाण्यासाठी काही नवीन शिकण्याचा विचार करा. तब्येत ठिक राहील.
मीन - कोणत्याही कामात फायदा होईल. पैशांसंबंधी चिंता राहील. कागदपत्रांसंबंधी महत्त्वपूर्ण काम होऊ शकते. फिरण्यासाठी दिवस चांगला आहे.
- डॉ. दीपक शुक्ल