मेष- आवडीच्या गोष्टी करण्यात वेळ घालवाल. गुंतवणूक करण्यात भर द्या. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतात. एकंदर दिवस चांगला आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. स्वतःसाठी आणि जीवनसाथीसाठी थोडा वेळ काढा. आरोग्याकडे लक्ष द्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- कुटुंबाची साथ मिळेल. तुमच्या वाणीवर मात्र ताबा ठेवा. कोणा एका कार्यक्रमासाठी तुम्हाला बोलावणं येणार आहे. दूरच्या ठिकाणी असणाऱ्या एखाद्या व्यक्तीशी संवाद घडण्याचा योग आहे. 


मिथुन- दैनंदिन कामांचा व्याप जास्त असेल. कामाच्या ठिकाणी प्रगतीचा विचार कराल. आरोग्य उत्तम असेल. मुलांच्या शिक्षणावर अधिक खर्च करावा लागेल. समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करा. धैर्याने पाऊल उचला. दिवसभर पैशांचाच विचार करत राहाल. जमिनीच्या गोष्टी फायद्याच्या ठरणार आहेत.  


कर्क- तुमचं पूर्ण लक्ष करिअरवर असेल. मित्रांसमवेत चांगला वेळ व्यतीत करण्याची संधी आहे. काही सकारात्मक बदल घडतील. 


सिंह- धार्मिक कामात अधिक रस घ्याल. गुंतवणुकीकडे लक्ष द्या. येत्या काळात गुंतनणूक कामी येईल. कुटुंबात ज्येष्ठ व्यक्तीची तब्येत खराब होवू शकते. जबाबदाऱ्या वाढतील. कोणाचं मन दुःखवू नका. जीवनसाथीकडून भेट वस्तू मिळू शकेल. जास्त खर्च केल्यामुळे पार्टनरसोबत विवाद होवू शकतो.  


कन्या- जास्त मेहनत करण्यासाठी तयार राहा. त्याचं फळही तुम्हाला मिळणार आहे. एकाग्रता परमोच्च शिखरावर असेल. 


तुळ- समोर येणाऱ्या प्रत्येक संधीलर लक्ष ठेवा. तुमची कामं अडणार नाहीत. एखादं अडकलेलं काम पुन्हा सुरु होईल. इतरांच्या गरजाही लक्षात घ्या. 


वृश्चिक - कोणा एका नव्या स्थानावर भेट देण्यासाठी जाण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये सुधार येतील. आर्थिक कारणास्तव एखादा प्रवास करावा लागू शकतो. 


धनु- विचारात असणारी कामं सुरू करा. फायदाच होईल. दिवस चांगला आहे. सामूहिक आणि सामाजिक कामांसाठी दिवस चांगला आहे. मित्रांना जास्त वेळ द्याल. गुंतवणूकीचे बेत आखाल. धनलाभ होऊ शकतो. काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. 


मकर- जबाबदारी पार पाडण्यावर लक्ष द्या. व्यापार आणि नोकरीवर लक्ष द्या. पुढे जाण्याच्या संधी आहेत. मित्रांकडून आर्थिक सहाय्य मिळेल. 


कुंभ- धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या कामांमध्ये यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी इतरांचं सहकार्य मिळेल. 


मीन- कुटुंब आणि मित्रपरिवाराची साथ मिळाल्यामुळं अडचणींवर मात करण्याची ताकद तुम्हाला मिळेल. अधिकाधिक गोष्टींमध्ये यशस्वी व्हाल. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल.