मुंबई : नवरात्रीचा 5 वा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. व्यापाऱ्यांना धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. नोकरदार लोक कौतुकाचा विषय बनतील. सोमवारी तुम्हाला हवा तसा निकाल मिळेल. संपूर्ण दिवस हसता हसता जाईल. आजचा (Horoscope 11 October  2021) दिवस कसा असेल, जाणून घेऊयात एस्ट्रो गुरु बेजान दारुवाला यांचे सुपूत्र चिराग दारुवाला यांच्याकडून. (spirituality horoscope of monday 11 october 2021 see astrology prediction your Scorpio Sagittarius Capricorn Aquarius zodiac)
 
मेष (Aries) : संपूर्ण दिवस उत्साहाने भरलेला असेल. मंगल कार्यात सहभागी व्हाल. कार्यालयातील वरिष्ठांकडून कौतुक होईल. स्तुत्य काम कराल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यवसायासाठी सोमवार खूप चांगला असेल.
 
वृषभ (Tarus) : व्यापारी वर्गासाठी चांगला दिवस आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात खांदेपालट होण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या वतीने तुम्ही निश्चिंत राहाल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिथुन (Gemini)  : तुमचा दिवस चांगला जाईल. उत्साह जाणवेल.  व्यवसायात नफा होईल. नोकरीची परिस्थितीही चांगली राहील. सोमवारी अपेक्षित तसंच होईल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे आणि आरोग्य सामान्यपणे चांगले राहील.


कर्क (Cancer) : सोमवार तुमच्यासाठी चांगला राहील. कामात यशासह नफाही मिळेल. आपण स्तुतीस पात्र व्हाल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. कुटुंब किंवा प्रियजनांसोबत चांगला वेळ जाईल. मांगलिक कार्यात सहभागी होण्याचे सौभाग्य मिळेल.


सिंह (Leo) : शिक्षण घेण्यासाठी सोमवार चांगला आहे, मेहनतीनुसार यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची योजना यशस्वी होईल. दिवसाची सुरुवात चांगली होईल.  मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांसह तुमचा प्रवास चांगला होईल.


कन्या (Virgo) : दिवस चांगला घालवण्यासाठी तुम्ही कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. मन प्रसन्न राहिल. कामात यश मिळेल.नवीन काम मिळू शकतं. फिरण्यासाठी घराबाहेर पडाल, ज्यामुळे तुम्हाला भरपूर मनोरंजन मिळेल.


तुळ (Libra) : हुशारीने केलेल्या कामात यशस्वी व्हाल. इच्छेनुसार कामं पूर्ण होतील. कौटुंबिक सुख चांगले राहील. कामात यश मिळेल.


वृश्चिक (Scorpio) : खूप आनंदी असाल. ज्ञानात भर पडेल. विचार दृढ होतील. संभाषण कौशल्य आणि हुशारीच्या जोरावर कामं पूर्ण कराल. कुटुंबियांकडून आनंद आणि समर्थन मिळेल.
 
धनु (Sagittarius) : सोमवारी कुटुंबियात सुखात असतील. शुभ कार्यात किंवा समारंभात सहभागी व्हाल. विशेष व्यक्तीसोबतची भेट संस्मरणीय ठरेल. कामासाठी दिवस चांगला आहे. उत्साहीपणा जाणवेल. प्रेमसंबंधात यश मिळेल.
 
मकर (Capricorn) : कामाच्या ठिकाणी दबदबा राहील. धनलाभ होईल. कुटुंबाच्या गरजांची पूर्ण काळजी घ्याल. दिवसभर चपळतेने, प्रत्येक कामे अगदी सहज पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना परीक्षा-स्पर्धेत यश मिळेल.
 
कुंभ (Aquarius) : दिवस चांगला जाईल. व्यवसायात नफा होईल. नोकरीत पदोन्नती होईल. दिलेले पैसे परत केले जातील. कामासाठी सोमवार उत्कृष्ट राहील. 


मीन (Pisces) : शुभ कार्यासाठी सोमवार शुभ राहील. मन प्रसन्न राहील. बऱ्याच काळानंतर तुम्हाला एखाद्याला भेटण्याची संधी मिळेल. नवीन कामाची सुरुवात फायदेशीर ठरेल. न्यायालयीन कामकाजातून दिलासा मिळेल.