आजचे राशीभविष्य | गुरूवार | ६ जून २०१९
कसा असेल तुमचा आजचा दिवस
मेष- आज नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत. पण उत्पन्नाचा आकडा कमी होण्याची शक्यता आहे. जूने त्रास नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. बचत आणि गुतंवणुकीचा विचार करू शकता. विचार कलेली कामे पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनतीची गरज आहे.
वृषभ- गुंतवणूक विचारपूर्वक करा. आज तुमचे मन कामात रमणार नाही. पूर्ण दिवस काळजी पूर्वक काम करण्याची गरज आहे. केलेली बचत खर्च होण्याची शक्यता आहे. दुखापत होण्याची शक्यता आहे. वाहने हळू चालवा.
मिथुन- व्यवहारात सावधानता बाळगा. ऑफिसमध्ये अधिक मेहनत करण्याची गरज आहे. यश सहजरित्या मिळणे अशक्यच आहे. जूने आजार डोकंवर काढू शकतात. नेहमीच्या कामांमध्ये मदत मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही गोष्टीवर तात्काळ निर्णय घेऊ नका. त्यामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. नुकसान होण्याची शक्यता आहे.
कर्क- विचार केलेले काम पूर्ण न झाल्यामुळे दुखी होऊ शकता. आज धन हानी होण्याची शक्यता आहे. तनाव आणि धावपळीचा दिवस असेल. जास्त काम कराल. पण फायदा कमी होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वरिष्ट सदस्याचे आरोग्य खालावेल.
सिंह- कामात यश मिळेल. फायद्याचे करार होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसुद्धा धन लाभ होण्याची शक्यता आहे. कामात अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. जे हवं आहे ते मिळाल्याने प्रसन्न व्हाल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. चांगली बातमी कानावर येईल.
कन्या- अधिक मेहनत करण्याची गरज आहे. त्याचे फळही चांगले मिळेल. व्यापारात लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. तणाव दूर होतील. साथीदारासह बाहेर फिरण्याचे योग आहेत.
तूळ- गुंतवणुकीचा विचार करत असाल तर विचारपूर्वक करा. नोकरी करणाऱ्यांनी कामाकडे लक्ष द्या. सहकार्यांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. मेहनतीच्या जोरावर वरिष्टांचे मन जिंकाल. साथीदाराचा सन्मान करा.
वृश्चिक- व्यापारासंबंधी तणाव वाढेल. सावधान राहण्याची गरज आहे. सहकार्यांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. जूने आजार डोकंवर काढू शकतात. नुकसान झाल्याची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कोणतेही नवीन काम हाती घेऊ नका.
धनु- व्यापार करणाऱ्यांसाठी दिवस उत्तम आहे. साथीदारासह वेळ व्यतीत कराल. नोकरी आणि व्यावसायात महत्वाची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. संपत्तीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल.
मकर- बेरोजगारदारांना रोजगार प्राप्त होण्याची संधी मिळेल. व्यापारामध्ये धन लाभ होईल. महत्वाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. पैशांच्या स्थितीत चांगले बदल होण्याची शक्यता आहे. कुटुंब, समाजात तुमचे महत्त्व वाढेल. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल. जोडीदारासोबत दिवस चांगला जाईल.
कुंभ- नोकरी करणाऱ्यांना उच्चपद मिळण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांकडून मदत मिळेल. सहकारी कामात मदत करतील. काही जून्या योजना पूर्ण झाल्याने फायदा होवू शकतो. नवीन काम हाती घेवू शकता. नवीन लोकांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. साथीदाराला धनलाभ होण्याचा योग आहे.
मीन- व्यापारात सावधानी बाळगा. नुकसान होण्याचे योग आहे. काही महत्वाच्या कामांमध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे. खर्च वाढण्याची शक्यता आहे. आखलेले बेत निष्फळ ठरतील.
डॉ. दीपक शुक्ल