मेष - दिवसभर व्यस्त राहाल. व्यवसायाशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने असतील. मन समाधानी राहील. व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबाला आणि मित्र परिवाराला वेळ द्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ - दिवस चांहला आहे. आज कामात व्यस्त राहाल. करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. महत्त्वाच्या गोष्टींना अधिक प्राधान्य द्या. कामांची यादी तयार करा. आरोग्याकडे लक्ष द्या.


मिथुन - नेहमीच्या कामापेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करावा लागेल. यामुळे येणाऱ्या दिवसांत तुम्हाला फायदा होऊ शकतो. व्यवसायासाठी नव्या लोकांशी संपर्क होतील. वैवाहीक जीवनात आनंद मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. 


कर्क - आज केलेले काम भविष्यासाठी लाभदायक ठरेल. तुम्ही बनवल्ये ओळखी फायद्याच्या ठरतील. आरोग्याकडे लक्ष द्या. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. 


सिंह - जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कामं वाढू शकतात. महत्त्वाच्या लोकांशी संपर्क वाढेल. नव्या संधी मिळतील. येणाऱ्या दिवसांत आधी केलेल्या कामांमधून प्रगती, फायदा होण्याची शक्यता आहे.


कन्या - स्वतःवर असलेलं नियंत्रण आज अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आज तुम्ही दुसऱ्यांच्या भावना सहज समजू शकाल. व्यवसायात यश आणण्यासाठी तुम्हाला जोर देऊन काम करण्याची गरज आहे. कामामध्ये सहकाऱ्यांची मदत होईल. कोणती चांगली बातमी मिळण्याचे योग आहेत. 


तुळ : अचानक धनलाभाचा योग आहे. भूतकाळात केलेले कार्य आता लाभदायक ठरतील. काम थांबले असले तरी पुढे यश मिळेल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. व्यवहारकौशल्य आणि सहनशक्ती जपा. 


वृश्चिक : आज केलेल्या प्रत्येक कामाचा तुम्हाला फायदा होणार आहे. काही महत्त्वाचे निर्णय तातडीने घ्यावे लागतील त्यासाठी तयार राहा. महत्त्वाची कागदपत्र सांभाळा. 


धनु : तुमच्या निर्णयात स्पष्टपणा असेल. अचानक धनलाभ झाल्याने मोठा फायदा होईल. अनेक प्रलंबित कामे मार्गी लागतील. आज घेतलेला एखादा निर्णय भविष्यकाळात फायदेशीर ठरू शकतो. 


मकर- आजचा दिवस खूप व्यस्त असेल. इतरांसमोर स्वत:ची बाजू स्पष्टपणे मांडा. ऑफिसमध्ये कामाची तपासणी होऊ शकते. परिस्थिती तुमच्यासाठी अनुकुल ठरेल


कुंभ- नोकरीत एखादा सन्मान मिळेल. जोडीदाराकडून चांगले सहकार्य लाभेल. जमीनजुमल्याचे व्यवहार करणाऱ्यांना यश मिळेल. जबाबदारी घ्यावी लागेल.


मीन : धनलाभ होण्याची चिन्हं आहेत. ज्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. अधिक काळासाठी याचे परिणाम तुम्हाला दिसून येतील. मित्रांचं सहकार्य मिळेल. एखादी शुभवार्ता मिळेल. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळतील.