राशीभविष्य १० फेब्रुवारी : `या` व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता
आजचा दिवस कसा असेल
मेष - वायफळ खर्च टाळा. आज काही प्रमाणात सावधानता बाळगा. दुसऱ्यांचं ऐकून स्वत:चं नुकसान कराल. डोळे बंद ठेवून कोणावर विश्वास ठेवू नका. पैशांच्या बाबतीत अडथळे येतील. आरोग्याकडे विशेष लक्ष दया. कोणत्याही कामात अतीघाई केल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन चांगले असेल.
वृषभ - नोकरी करणाऱ्यांची बढती होण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्यांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून आणि सहकार्यांकडून सन्मान मिळेल. दिवस चांगला आहे.
मिथुन - अडकलेले पैसे मिळतील. ऑफिसमधील वरिष्ठ लोकांना प्रभावित कराल. अधिक उत्पन्न आणि नोकरी बदल्याचा विचार कराल. यामध्ये नशीब साथ देईल. नवीन संधी मिळतील. अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल.
कर्क - अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रोफेशनल नाते-संबंध अधिक दृढ होतील. येत्या काळात भरभरून यश मिळेल. आर्थिक परिस्थित अधिक चांगली होईल. जीवनसाथी सोबत वेळ व्यतीत कराल.
सिंह - अधिकाऱ्यांकडून मदत मिळणार नाही. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा आहे. तनावात वाढ होण्याची शक्यता आहे. समजदारीने कोणताही निर्णय घ्या. कामात मन रमेल. नवे काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला नाही. आरोग्याकडे लक्ष द्या.
कन्या - नोकरीमधे बढती मिळण्याची शक्यता आहे. विचारकरून गुंतवणूक करा. व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ स्वत:साठी काढा. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. जीवनसाथी कडून मदत मिळेल. चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
तूळ - नोकरी आणि व्यवसायात अडकलेले पैसे मिळतील. दिवस चांगला आहे. आज केलेल्या कामांमुळे कौतुक होईल. अडचणीत असलेल्या व्यक्तीची मदत कराल. गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस आहे. जीवनसाथीकडून मदत मिळेल.
वृश्चिक - आर्थिक चणचण दूर होईल. पैसे अडकतील. दिवसाची सुरुवात चांगली नसेल. कुटुंबातील व्यक्ती अडचणीत टाकतील. कोणा एका निर्णयाच्या प्रतिक्षेत असाल तर धीर राखा. निकाल सकारात्मक असेल. दिवस चांगला जाईल.
धनू - अनेक दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. कौटुंबीक संबंध सुधारतील. तुमची प्रतीमा चांगली राहील. कुटुंबाची काळजी घ्या. आजारपणा दूर होईल. नवीन गोष्ट सुरू करण्याचा विचार करत असाल तर नक्की करा.
मकर - अतिघाईमध्ये कोणतंही काम करु नका. आर्थिक व्यवहारांविषयी चर्चा करु नका. अडचणी वाढतील. आरोग्याची काळजी घ्या. पोटाचे विकार होऊ शकतात. ज्येष्ठ व्यक्तींकडे लक्ष द्याल.
कुंभ - आज तुम्ही प्रेम आणि दृढ विश्वासावर अवलंबून असाल. पण प्रेमात आज थोडी नाराजी स्विकारावी लागेल. काम मनाप्रमाणे कराल. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता अधिक. शरिराकडे लक्ष द्या. आजूबाजूच्या बदलांमुळे त्रास होण्याची शक्यता.
मीन - आज तुम्ही सल्ले देण्यासाठी उत्सुक असाल. आजचा दिवस अतिशय चांगला आहे. कामातून आनंद मिळेल. त्याचप्रमाणे व्यवसाय करणाऱ्यांसाठी थोडा खडतर दिवस आहे. काही खास व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. साथीदाराची मदत मिळेल.