मेष - आज तुम्हाला तुमचं महत्त्वं कळेल. दैनंदिन कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गोष्टीला स्वत:च्या स्तरावर सोडवण्याचा प्रयत्न करा. राजकारणाच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्यांना एखादं मोठं पद मिळेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ - भावनांमध्ये चढ- उतार जाणवेल. कोणत्याही गोष्टीची चिंता करु नका. एखादी शुभवार्ता मिळेल. असे काही बेत आखाल ज्याचा येत्या दिवसांमध्ये फायदा होणार आहे. 


मिथुन- पैशांची चणचण भासणार नाही. अचानक धनलाभ होऊ शकतो. कोणाच्या मनात काय सुरु आहे, हे तुम्हाला लगेच कळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. अडकलेली कामं पूर्ण होतील. 


कर्क- अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या योजनेचा फायदा होईल. आज घेतलेल्या निर्णयांचे दूरगामी परिणाम दिसतील. कामाच्या निमित्त्ताने एखादा प्रवासयोग संभवतो. जोडीदाराचा सहवास लाभेल.  


सिंह- कोणा एका व्यक्तीसोबतचं नातं सुधारेल. आत्मविश्वासाचा फायदा होईल. सवयींवर लक्ष ठेवा. दिवस सर्वसामान्य असेल. जुन्या गुंतवणूकीचा तुम्हाला फायदा होईल. 


कन्या- एखादं वाहन खरेदी करण्याची इच्छा होईल. आज तुम्ही भावनात्मक असाल. साथीदाराची साथ मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. 


तुळ- दुवस तुमच्यासाठी सर्वसामान्य आहे. आज जास्त मेहनत करावी लागू शकते. एखादं नवं काम कराल. शुभकार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. नव्या मित्रांची भेट फायद्याची ठरेल. 


वृश्चिक- कमीत कमी वेळात जास्त काम आटोपण्याचा प्रयत्न कराल.  एखादी शुभवार्ता कळेल. व्यवसायात फायदा होईल. जमीन आणि देवाणघेवाणीच्या व्यवहारांत नशीबाची साथ असेल. 


धनू- एखादं खास काम कुटुंबाच्याच मदतीने पूर्ण कराल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीतील ताण दूर होईल. पूर्ण झालेल्या कामांचा फायदा होण्यास सुरुवात होईल. प्रेमात यश मिळण्याची शक्यता आहे.  


मकर- हाताशी जास्तीचा वेळ ठेवा. आज कामं थोडी जास्त वेळासाठी चालतील. परिस्थिती तुमच्या पक्षात आहे. तुमचं मत स्पष्टपणे इतरांसमोर मांडा. 


कुंभ- कामाच्या व्यापामुळे तुम्हाला इतरांकडून आदर, सन्मान मिळेल. खर्च आणि गुंतवणुकीची आखणी कराल. इतरांकडून मदत मिळेल. 


मीन- काम पूर्ण करतेवेळी इतरांची मदत मिळेल. एखादं जुनं कर्ज फेडाल. नात्यांच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय घ्याल. प्रेमात यश मिळेल.