`या` कारणासाठी चप्पल कधीही उलटी न ठेवण्याचा वडिलधारीमंडळी सल्ला देतात
चप्पल उलटी ठेवल्याने काय नुकसान होतं? जाणून घ्या.
मुंबई : अनेकांना ही सवय असते की घराबाहेर किंवा कुठेही चप्पल उटली दिसली की, ते सरळ करतात. चप्पल उलटी ठेवू नये हे लोकांना माहित असले, तरी ती उलटी का ठेवू नये यामागचं नेमकं कारण बऱ्याच लोकांना माहित नसतं. खरंतर आपल्या घरातील वडीलधारी मंडळी आपल्याला असं करण्यासाठी सांगतात. ज्यामुळे आपण ते करतो. परंतु सगळ्यांनाच यामागचं कारण माहित नसतं. तर आज आम्ही असं करण्यामागचं कारण तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला हे समजून घेण्यासाठी मदत होईल.
चला तर मग जाणून घेऊयात की, चप्पल उलटी ठेवल्याने काय नुकसान होतं?
असं केल्याने मlता लक्ष्मीला राग येतो
असे मानले जाते की जर घरात उलटी चप्पल किंवा उलटे बूट पडलेलं असेल, तर ते लगेचच सरळ करावेत, कारण यामुळे घरात भांडणे होऊ शकतात आणि देवी लक्ष्मीला याचा रागही येतो. त्यामुळेच तुम्हा देखील कधी चप्पल उलटी पडलेली दिसली की, ती सरळ करा.
विचारांवर वाईट परिणाम
घराच्या दारात चुकूनही चपला किंवा बुट उलटे ठेवू नयेत. कारण यामुळे घरातील सदस्यांच्या विचारांवर वाईट परिणाम होतो. वास्तूनुसार, उलटे शूज आणि चप्पल केल्याने घरातील सकारात्मकता निघून जाते. त्यामुळे कुटुंबाच्या सुख-शांतीमध्ये खूप अडथळे येतात.
रोगराई वाढते
तसेच असे ही मानले जाते की, चप्पल आणि शूज उलटे ठेवल्याने घरामध्ये आजार आणि दुःख वाढतात. त्यामुळे चप्पल आणि बूट काढल्यानंतर चुकून उलटे झाले तर लगेच सरळ करा. तसेच वृद्ध मंडळी असे देखील सांगतात की, चप्पल आणि शूज कधीही उलटे ठेवू नका, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.
शनीचा प्रकोप होतो
असे मानले जाते की, घरात शूज आणि चप्पल उलटे ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण होते. तसेच चप्पल आणि शूज उलटे ठेवल्याने शनिदेवाचा प्रकोप राहतो. ज्यामुळे तुम्हाल गंभीर परिणामांना सामोर जावं लागू शकतं.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)