मुंबई : आज माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी. माघ महिन्यात ही संकष्टी चतुर्थी आल्याने याला विशेष महत्त्व आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दिवशी भगवान गणेशाची आराधना केली जाते. उपवास ठेवला जातो. मान्यतेनुसार गणपती सर्व संकटे दूर करतो. त्यामुळे गणपतीचे व्रत घरात शांती, सुख-समृद्धी आणि परिजनांच्या दीर्घायुषासाठी केले जाते.


देशभरात ही संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. देशाच्या विविध भागात ही चतुर्थी वेगवेगळ्या नावाने साजरी होते. सर्व देवांच्या पुजेआधी भगवान गणेशाची पूजा केली जाते. 


त्यातच संकष्टी आणि शुक्रवार एकत्र आल्याने याला अधिक महत्त्व आहे. शुक्रवार हा लक्ष्मीमातेचाही दिवस मानला जातो. त्यामुळे लक्ष्मी माता आणि गणपतीची पूजन एकत्र करा. 


चंद्रोदय - रात्री ९ वाजून ४९ मिनिटे