Sun Transit In Sinh Rashi: नवग्रहांमध्ये सूर्याचं स्थान महत्त्वाचं असून ग्रहाचा राजा म्हणून संबोधलं जातं. सूर्य महिनाभर एका राशीत राहतात आणि राशी बदल करतात. आता 11 महिन्यानंतर म्हणजेच 17 ऑगस्टला सूर्य ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत राजकुमार बुध ग्रहाने आधीच गोचर केलं आहे. सूर्याच्या राशी बदलाचा आणि सूर्य-बुध युतीच्या काही राशींवर शुभ अशुभ परिणाम जाणवणार आहे. ग्रहांचा गोचर व्यक्तिगत कुंडलीतील ग्रहस्थितीवर फळ देतात. चला तर मग जाणून घेऊयात या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीवर काय परिणाम होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोकं शांत ठेवून काम करा


वृषभ राशीच्या लोकांनी या काळात डोकं शांत ठेवू काम करावं. कोणी तुम्हाला डिवचलं तरी या काळात रागावर नियंत्रण ठेवा. तसेच एखादा त्रास असेल तर शांतपणे सोडवा. या काळात आपल्या तब्येतीची काळजी घ्याल. त्याचबरोबर जे लोक आजारी आहेत आहेत त्यांनी नियमित औषधं घ्यावीत. 


घरातील वादाकडे दुर्लक्ष करा


सूर्याच्या राशी परिवर्तनानंतर कौटुंबिक वादाकडे दुर्लक्ष करा. कारण तुमचा हस्तक्षेपामुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कोणताही तणाव घेऊ नका. त्याचबरोबर प्रॉपर्टीच्या वादाबाबत सतर्क राहा. तसेच जोडीदाराला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा.


सोयीसुविधांचा अभाव आणि अपमान होण्याची शक्यता


काही लोक तुम्हाला विनाकारण त्रास देऊ शकतात. ऑफिस किंवा घरी तुमच्याबाबत खोट्या तक्रारी करून तुम्हाला त्रास देऊ शकतात. या परिस्थितींमुळे प्रतिष्ठा देखील कमी होऊ शकते. जर तुम्हाला कुठेतरी प्रवास करायचा असेल कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आरक्षण करावे. प्रवासादरम्यान तुम्ही तुमची औषधे आणि इतर आवश्यक वस्तू सोबत ठेवाव्यात अन्यथा तुम्हाला गैरसोयीला सामोरे जावे लागेल. या महिन्यात सुखसुविधांचा अभाव जाणवेल ज्यामुळे तुम्हाला मानसिक गोंधळ होऊ शकतो.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)