Sun Transit : ग्रहाचा राजाचा सूर्य (Surya Gochar) लवकरच कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या राशी बदलामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होत असता. याचा परिणाम 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव दिसून येतो. येत्या 17 ऑगस्टला सिंह राशीत गोचर (Surya Budh Yuti 2023) करणार आहे. सिंह राशीत आधीपासून ग्रहांचा राजकुमार विराजमान आहे. त्यामुळे सिंह राशीत राजा आणि राजकुमाराच्या या भेटीतून बुधादित्य राजयोग (Budhaditya Rajyog) तयार होतोय. या राजयोगामुळे काही राशींचे भाग्य सोन्यासारखं चमकणार आहे. (sun transit Surya Budh Yuti in leo 2023 budhaditya rajyog will give benefits to these zodiac astrology news in marathi)


मेष (Aries)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांना बुधादित्य राजयोगाचा सर्वाधिक भाग्यशाली ठरणार आहे. या राजयोगामुळे मोठा आर्थिक लाभ होणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. पगारवाढीसोबत पदोन्नती मिळणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. तुमचं बँक बॅलन्स वाढणार आहे. कुटुंबात आनंदी वातावरण असणार आहे. या राजयोगामुळे भाग्य तुमच्यासोबत असणार आहे. 


हेसुद्धा वाचा - नागपंचमीला अत्यंत दुर्मिळ योग! श्रावणातील पहिला सण 'या' राशींना करणार लखपती


कर्क (Cancer)


सूर्य गोचरमुळे सिंह राशीत बुधादित्य राजयोगामुळे कर्क राशीच्या लोकांना अमाप पैसा मिळणार आहे. हा राजयोग या राशीच्या कुंडलीतील धनाच्या घरात तयार होतो आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होणार आहे. त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. परदेशात ज्यांचा व्यवसाय असेल त्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे. तुमचे अनेक महिन्यांपासून अडकलेली पैसे परत मिळणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होणार आहे. 



तूळ (Libra)


बुधादित्य राजयोगाच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होणार आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा धनलाभ होणार आहे. नवीन योजनेवर काम करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. या शुभ राजयोगाच्या प्रभावाने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे. त्याशिवास कोर्टकचेरीच्या वादातून तुमची मुक्तता होणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Samsaptak Rajyog : शनि आणि सूर्याच्या युतीमुळे शुभ राजयोग, लक्ष्मी येणार तुमच्या दारी


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)