ऑगस्ट अखेरीस सूर्य-शुक्र यांचा शुभ संयोग, 4 राशींना धनलाभ होण्याची शक्यता
काही राशीच्या लोकांना या काळात लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
मुंबई : 31 ऑगस्ट रोजी शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल ज्याठिकाणी सूर्य देव आधीच उपस्थित असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या दोन ग्रहांच्या संयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. काही राशीच्या लोकांना वैवाहिक जीवनात अडचणी येतील. दुसरीकडे, काही राशीच्या लोकांना या काळात लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान सूर्य आणि शुक्र सिंह राशीत असणार आहेत. या ठिकाणी तुम्हाला कळेल की कोणत्या राशीसाठी हे संयोजन शुभ सिद्ध होऊ शकतं.
वृषभ राशी
शुक्र आणि सूर्य यांच्या संयोगाने तुमच्या सुखसोयी आणि चैनीमध्ये वाढ होईल. कौटुंबिक जीवन छान होणार आहे. उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे.
मिथुन
तुमचं संवाद कौशल्य वाढेल. या काळात तुम्ही प्रवासातून चांगले पैसे कमवू शकाल. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध दृढ राहतील. या काळात करिअरमध्ये चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. एकापेक्षा जास्त माध्यमातून पैसे मिळतील.
कर्क
या काळात चांगले पैसे मिळतील. एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून कमाई करणं शक्य होणार आहे. तुमच्या सुख-सुविधा वाढतील. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल राहील. वित्त क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ
या काळात तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि तुम्ही संपत्ती जमा करू शकाल. गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)