Sun Transit 2024 : प्रत्येक ग्रह आपल्या निश्चित वेळेनंतर आपली स्थिती बदलत असतो. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला ग्रह गोचर असं म्हणतात. ग्रहांचा राजा सूर्यदेव प्रत्येक महिन्यात आपली स्थिती बदलतो. ग्रहांच्या या हालचालीमुळे शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येतात. अशातच आता वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यदेव 13 फेब्रुवारीला आपली राशी बदलणार आहे. सूर्य आता मकर राशीतील आपला प्रवास पूर्ण करून कुंभ राशीत प्रवेश करतोय. सूर्य ग्रह 13 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात कुंभ राशीत राहणार असल्याने याचा परिणाम अनेक दिसून येणार आहेत. ज्योतिषशास्त्र अभ्यासक श्वेता यांनी याविषयी माहिती दिलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्क


कुंभ राशीत सूर्याचे भ्रमण आणि शनीच्या संयोगामुळे या राशींवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाशी संबंधित काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. 


वृश्चिक


वृश्चिक राशींच्या लोकांनी जरा जपून रहावं. वृश्चिक राशीच्या लोकांना जवळची व्यक्ती धोका देण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान देखील होऊ शकतं.


मकर


कुंभ राशीत सूर्याचे भ्रमणामुळे मकर राशींच्या लोकांची चिडचिड वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्य तितकं शांत रहा. मानसिक परिणाम होणार नाही, याची काळजी घ्या.


कुंभ 


कुंभ राशींच्या लोकांचा कामाच्या ठिकाणी वाद आणि तणाव वाढू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांचेही नुकसान होऊ शकतं.


मीन


मीन राशीच्या लोकांना समस्यांना सामोरे जावे लागू शकतं. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनेक वेळा विचार करावा लागेल. अनावश्यक खर्च वाढू शकतो. कोणालाही कर्ज देणे टाळावे लागेल.   


या राशींना होईल फायदा


मिथुन, तूळ, कन्या आणि सिंह राशीच्या लोकांना सूर्याच्या राशीच्या बदलामुळे फायदा होऊ शकतो. पूर्वीच्या तुलनेत कामात चांगले परिणाम दिसून येतील.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)