Surya Grahan 2023 : वर्षातील पहिलं सूर्यग्रहण लवकरच होणार आहे.  चंद्रग्रहण (Chandra Grahan 2023) आणि सूर्यग्रहणाला (Solar Eclipse 2023) खगोलशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. यंदाच सूर्य ग्रहण हे खूप खास आहे. यावेळी हायब्रीड सूर्यग्रहण असणार आहे.  हायब्रीड सूर्यग्रहणाला (hybrid solar eclipse) निंगालू किंवा शंकर सूर्यग्रहण असंही म्हणतात. हायब्रीड म्हणजे आंशिक, संपूर्ण आणि कंकणाकृतू अशा तीनही स्वरुपांत दिसणार आहे. यावर्षी एकून 4 ग्रहण असणार आहेत. त्या पहिले सूर्यग्रहण पाच दिवसांवर येऊन ठेपलं आहे.  (surya grahan 2023 date and after 100 years Hybrid Solar Eclipse effect of solar eclipse These Zodiac Signs get Money)


कधी आहे सूर्यग्रहण आणि वेळ? (surya grahan 2023 in india date and time)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैशाख अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण असणार आहे. म्हणजे पाच दिवसांनी 20 एप्रिल (solar eclipse april) गुरुवारी पहिलं सूर्यग्रहण असणार आहे. हे ग्रहण सकाळी 7.45 वाजता सूरु होईल आणि दुपारी 12.29 पर्यंत संपणार आहे. 


भारतात दिसणार का ग्रहण? (when is solar eclipse in india)


हायब्रीड सूर्यग्रहण (hybrid solar eclipse) आशियातील काही देशांसह, ऑस्ट्रेलिया, हिंदी महासागर आणि अंटार्क्टिकामध्ये दिसणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतात सूर्यग्रहण काळात सूतक नसणार आहे. 


'या' राशींना कोट्यवधी सूर्याचे तेज


वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासकानुसार यंदाचं सूर्यग्रहण हे काही राशींसाठी अत्यंत फलदायक आणि आर्थिकदृष्ट्या चांगल ठरणार आहे. (Astrology Today In marathi)


मेष रास (Aries)


सूर्यग्रहणाच्या या राशीच्या लोकांवर सर्वाधिक परिणाम दिसणार आहे. सूर्यदेव या राशीच्या लोकांवर खूष होणार आहे. या लोकांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. कामाच्या ठिकाणी त्यांचं मान सन्मान वाढणार आहे. 



वृषभ (Taurus)


या राशीच्या लोकांसाठीही सूर्यग्रहण भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांची आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. नवीन नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. तुमच्या सर्व इच्छा सूर्यग्रहण काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. 


सिंह (Leo)


सूर्य हा सिंह राशीचा स्वामी असल्याने या राशीवर सूर्यग्रहणाचा चांगला प्रभाव दिसून येणार आहे. 21 एप्रिलला गुरु मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांचे नशीब सूर्यासारखं चमकणार आहे. रखडलेली कामं मार्गी लागणार आहेत.  



कन्या (Virgo)


या राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण फलदायी ठरणार आहे. रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. आर्थिक लाभ होणार आहे. मात्र या लोकांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. 


मिथुन  (Gemini)


या राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण आर्थिक प्रगती घेऊन आला आहे. गुंतवणुकीतून पैसे मिळणार आहेत. कोर्टकचेरीमधील वाद मिटणार आहेत. तुमच्या मेहनतीचं फळ या काळात मिळणार आहे. 


धनु (Sagittarius)


सूर्यग्रहणाच्या या राशीच्या लोकांना सर्वाधिक फायदा होणार आहे. चोहूबाजूने पैसा येणार आहे. उद्योगपती आणि नोकरदार वर्गासाठी हा काळ सूर्याचे नशीब घेऊन आला आहे. मनासारखे काम होणार असल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Akshaya Tritiya 2023 Date : अक्षय्य तृतीया कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व



(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)