Surya Grahan 2024 Chaturgrahi Yog : फाल्गुन महिन्यातील शेवटी अमावस्या अतिशय महत्त्वाची आहे. कारण यादिवशी 2024 मधील पहिलं सूर्यग्रहण आहे. सूर्यग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना असली तरी वैदिक ज्योतिषशास्त्रात त्याला त्याला महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहण ही एक अशुभ घटना मानली जाते. यंदा सूर्यग्रहणाला अतिशय दुर्मिळ असा योग तब्बल 500 वर्षांनी जुळून आला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण हे मीन राशीत लागणार आहे. तर यादिवशी ग्रहांचा राजा सूर्यदेव, बुद्धीचा कारक आणि ग्रहांचा राजकुमार बुध, मायावी ग्रह राहू आणि संपत्तीचा कारक शुक्र यांचा मीन राशीत संयोग होणार आहे. सूर्यग्रहणाला मीन राशीत ग्रहांचा चतुग्रही योग काही राशींसाठी भाग्यशाली सिद्ध होणार आहे असा दावा ज्योतिषशास्त्र पंडितांनी केलाय. (Surya Grahan 2024 Rare yoga after 500 years of solar eclipse These' people will get immense wealth)


कधी आहे सूर्यग्रहण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खगोलशास्त्रीय तज्ज्ञांनुासर सूर्यग्रहण हे भारतीय वेळेनुसार 8 एप्रिलला रात्री 9.12 वाजेपासून पहाटे 1.20 वाजेपर्यंत असेल. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. सूर्यग्रहणाला असलेला चतुग्रही योग कुठल्या राशींसाठी शुभ असणार आहे जाणून घ्या. 


हेसुद्धा वाचा - Surya Grahan 2024 : तब्बल 50 वर्षांनंतर गुढीपाडव्यापूर्वी अत्यंत दुर्मिळ सूर्यग्रहण, 7.5 मिनिटं पूर्ण अंधार


मेष रास (Aries Zodiac)  


सूर्यग्रहणाच्या दिवशी असलेला चतुग्रही योग हा मेष राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळणार आहे. तुम्हाला शिक्षण क्षेत्रात यश मिळणमार आहे. व्यवसायिकांना लाभ होणार आहे. नवीन नोकरीची संधी लाभणार आहे. नोकरदारांना पदोन्नती आणि वेतनवाढ होण्याची शक्यता आहे. तुमचं पद आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Somvati Amavasya 2024 : भूतडी अमावस्येला Surya Grahan चा घातक संयोग, कोणाला घ्यावी लागणार काळजी?


सिंह रास (Leo Zodiac) 


सूर्यग्रहणाच्या दिवशी असलेला चतुग्रही योग सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. तुमच्या सर्व इच्छा या काळात पूर्ण होणार आहे. जोडीदार असो किंवा कुटुंबातील सदस्य यांचं सहकार्य तुम्हाला लाभणार आहे. तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. अडकलेले पैसे परत मिळणार आहे. मालमत्ता किंवा वाहन खरेदी करणार आहात. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होणार आहे. 


धनु रास (Sagittarius Zodiac) 


चतुग्रही योग धनु राशीच्या लोकासाठी लाभदायक ठरणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. तुमचं व्यक्तिमत्वही सुधारणार आहे. पैसे कमवण्याचे नवीन मार्ग तुम्हाला गवसणार आहे. तुमच्या धैर्य आणि शौर्यात वाढ होणार आहे. नवीन नातेसंबंध जुळणार आहेत. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.