Surya Grahan on Diwali  2022 in India : हिंदू कॅलेंडरनुसार दिवाळी हा सण कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो. यंदा दिवाळी ( Diwali 2022 ) ऑक्टोबरमध्ये येत आहे आणि विशेष म्हणजे यावेळी दिवाळीच्या दिवशी सूर्यग्रहण ( Sury Grahan 2022 ) आहे. यावेळी दिवाळी 24 ऑक्टोबरला असून या दिवशी रात्री ग्रहण (Surya Grahan) होणार आहे. सुतक असल्यामुळे ग्रहणाच्या आधी सुमारे दोन तास पूजा होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा स्थितीत लक्ष्मी देवीची (laxmi puja 2022) पूजेबाबत  लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. सूर्यग्रहणामुळे दिवाळीच्या (diwali 2022) लक्ष्मीपूजन आणि गोवर्धन पूजेवर काय परिणाम होईल आणि सुतक कालावधी किती काळ टिकेल हे जाणून घेऊया. चला तर मग जाणून घेऊया या शंकेवर उपाय काय.


कार्तिक अमावस्या आणि दिवाळी कधी 


कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिवाळी साजरी केली जाते. 2022 मध्ये कार्तिक महिन्याची अमावस्या 24 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 5:28 वाजता सुरू होईल आणि 25 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 4:18 वाजता समाप्त होईल. त्यामुळे 24 ऑक्टोबरला दिवाळी साजरी करणे शुभ राहील. 25 ऑक्टोबर रोजी 2022 सालातील शेवटचे सूर्यग्रहण होत आहे.


वाचा : Flipkart Sale वर वस्तू विकत घेण्याचा विचार करताय? मग हे वाचाच


खंडग्रास सूर्यग्रहणचा कालावधी 


पंचांगानुसार वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 2:29 वाजता होईल. त्याचा सुतक कालावधी 12 तास अगोदर म्हणजेच 24 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 2.30 वाजता सुरू होईल. शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर होणारे सूर्यग्रहण फारसे प्रभावी नसते. असं असलं तरी हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे दिवाळीला होणाऱ्या लक्ष्मीपूजनावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.


 


 


(Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE NEWS त्याची पुष्टी करत नाही.)