Flipkart Sale वर वस्तू विकत घेण्याचा विचार करताय? मग हे वाचाच

Price Tracker Extension:  आपण सर्वोत्तम डीलबद्दल काळजीत आहात? आपण अगदी सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. याच्या मदतीने तुम्ही उत्पादन चांगल्या किमतीत उपलब्ध आहे की नाही हे शोधू शकता. तुम्ही मागील विक्रीची किंमत देखील तपासू शकता

Updated: Sep 23, 2022, 11:33 AM IST
Flipkart Sale वर वस्तू विकत घेण्याचा विचार करताय? मग हे वाचाच

Flipkart Sale :  सध्याच्या गडबडीमुळे व व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्याला खरेदी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. अशावेळी आपण काही शॉपिंग साइट्सला भेट देतो. काही शॉपिंग साइट्स आपल्याला कमी सवलतीत हव्या त्या वस्तू देतात. अनेक शॉपिंग साइट्सवर सणासुदीच्या काळात सेलही सुरु असतात. कमी दरात आपल्याला हवी ती गोष्ट सहज मिळू शकते. जर तुम्हाला Flipkart आणि Amazon या दोन्ही प्लॅटफॉर्मवर आकर्षक सूट मिळत आहे. समजा तुम्हाला या सेलमध्ये एखादे उत्पादन घ्यायचे आहे, पण तुम्हाला त्या उत्पादनावर सर्वात स्वस्त डील मिळत आहे तर ते कसे विकत घेयाचे याबाबत सविस्तर बातमी वाचवा...

ऑनलाईन शॉपिंग (online shopping) करताना तुम्हाला एखादी वस्तू आवडली का ती विश लिस्ट (wish list) करून ठेवता. पण आता विश लिस्टमधून पण कमी किंमतीत वस्तू खरेदी (shopping) करता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला क्रोम एक्स्टेंशन डाउनलोड (Chrome Extension) करावे लागेल.  क्रोम एक्स्टेंशनच्या मदतीने तुम्हाला  प्राइस ड्रॉप आणि प्राइस हिस्ट्री ग्राफ यांची माहिती मिळेल. 

एक्स्टेंशन कसे वापरणार?

प्राइस ट्रॅकर (price tracker) असे या एक्स्टेंशन चे नाव असून कोणीही ते डाउनलोड करू शकता. Chrome वापरकर्ते हा एक्स्टेंशन डाउनलोड करून वापरू शकतात. यासाठी तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

- सुरूवातील तुम्हाला PC वर Chrome ब्राउझरमध्ये जावे लागेल.
- यानंतर प्राइस ट्रॅकर एक्स्टेंशन (Price Tracker Extension) डाउनलोड करावे लागेल. 
- हे तुम्ही Google Chrome वेब स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. 
- आता तुम्हाला वेब ब्राउझरमध्ये एक्स्टेंशनला इनेबल करावे लागेल. 
- येथूनच तुम्हाला Flipkart लॉगिन करावे लागेल. 
- त्यानंतर तुम्हाला जी वस्तू खरेदी करायची आहे त्याची निवड करा.  
- त्यावर तुम्हाला प्राइस डॉप अलर्ट आणि प्राइस हिस्ट्री ग्राफ हे दोन पर्याय दिसतील.   

फायदे काय आहेत?
ग्राफच्या मदतीने तुम्ही चेक करू शकता की, ही वस्तू यापूर्वी पेक्षा कमी किमतीत उपलब्ध होती का ते तपासू शकता. त्याच वेळी प्राइस डॉप अलर्ट त्याच्या सोयीनुसार काम करणार असून त्या मदतीने तुमच्या आवडीचे डिव्हाइस सर्वात कमी किमतीत उपलब्ध होईल तेव्हा तुम्हाला अलर्ट मिळतील. मात्र हे एक्स्टेंशन तुम्हाला फक्त फ्लिपकार्टवरचं उपलब्ध दिसेल.