Surya Guru Yuti 2023: ग्रहतारे आणि त्यांचे राशींवर होणारे परिणाम हे अनेकांसाठीच महत्त्वाचे असतात. बऱ्याचदा ग्रहांची स्थिती आणि रास मिळून काही असे चमत्कार घडतात, ज्यामुळं नशीब फळबळतं किंवा मग काही व्यक्तींना ही युती सावध करण्याचं काम करते. सध्याही दोन ग्रहांची अशीच युती होणार आहे, हे ग्रह आहेत सूर्य आणि गुरू. (Surya Guru Yuti 2023 astro Rashi Parivartan latest Marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रहांचा राजा मानल्या जाणाऱ्या सूर्याचं जेव्हाजेव्हा गोचर होतं तेव्हातेव्हा प्रत्येक राशीचं भाग्य उजळून निघतं. तर, बृहस्पती हा हिंदू धर्मात देवांचा गुरू मानला जातो. गुरू नावाच्या ग्रहाचे पंचांगातले नाव बृहस्पती. हाच गुरु एप्रिल महिन्यापासून (22 एप्रिल 2023) सूर्यासोबत मेष राशीमध्ये एकत्र येत तिथं युती करणार आहे. तब्बल 12 वर्षांनंतर हा महासंयोगाचा योग साकारला जाणार आहे. ज्याचे थेट परिणाम 5 राशींच्या व्यक्तींवर होणार आहेत. याच तुमचीही रास आहे का? चला पाहुया... 


सिंह 
सूर्य आणि गुरुच्या युतीमुळं तुम्हाला परदेशात प्रवास करण्याचा योग आहे. शिक्षणासाठी परदेशात जाण्याची इच्छा असेल तर ती लवकरच पूर्ण होणार आहे. शत्रूवर मात करण्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. राजकीय क्षेत्रांमध्ये सक्रीय असणाऱ्या व्यक्तींवर नवी जबाबदारी येणार आहे. 


धनु
एखादं नवं वाहन खरेदी करण्याचा बेत आखाल. संपत्तीमध्ये गुंतवणूक कराल. अर्थार्जनाचे नवे मार्ग तुम्हाला सापडणार आहेत. घरात एखादं मंगलकार्य असेल त्यामुळं तुम्ही त्यातच रमलेले असाल. आजुबाजूला सकारात्मक उर्जा असेल. 


हेसुद्धा वाचा : Horoscope 10 February 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींनी वाईट सवयी दूर करणं गरजेचं!


तुळ 
न्यायालयीन कामं निकाली निघणार आहेत. आज आप्तेष्ठांची मोठी मदत होणार आहे. नातेवाईकांना भेटण्याचा योग आहे. उधार दिलेले पैसे परत मिळणार आहेत ज्यामुळं तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. 


मेष 
तुम्ही करताय त्या प्रत्येत कामाचं फळ तुम्हाला मिळणार आहे. समाजात असणारा तुमचा मान वाढणार आहे. एखाद्या नव्या व्यक्तीची भेट तुमचं आयुष्य पालटणार आहे. काही क्षेत्रांमध्ये तुमच्यासाठी प्रगतीच्या वाटा खुल्या झाल्या आहेत. 


(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भ आणि धारणांच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)