Surya Nakshatra Parivartan 2022 Effect on Zodiac Signs: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशी आणि नक्षत्र बदलला महत्त्व आहे. ठराविक कालावधीनंतर प्रत्येक ग्रह आपली स्थिती बदलत असतो. त्याचा परिणाम मनुष्य आणि पृथ्वीवर होतो, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. सूर्यदेवांनी 22 जून रोजी नक्षत्र बदललं आहे. यावेळी सूर्य अर्द्रा नक्षत्रात आहे. 6 जुलैपर्यंत सूर्य या नक्षत्रात राहील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी 15 जूनला सूर्याने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. सूर्य जेव्हा अर्द्रा नक्षत्रात असतो तेव्हा त्या काळात खूप शुभ फळं मिळतात.  या बदलाचा 3 राशीच्या लोकांवर परिणाम होईल. यावेळी भगवान शिव आणि विष्णूची पूजा करावी. 


मिथुन- अर्द्रा नक्षत्रातील सूर्य मिथुन राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. आर्थिक लाभामुळे आर्थिक स्थिती मजबूत राहील. पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. नशिबाची साथ मिळाल्याने सर्व कामे पूर्ण होतील. नवीन काम सुरू करण्यासाठी उत्तम काळ आहे.


सिंह- सूर्य राशीत होणारा बदल सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ असेल. आतापर्यंत रखडलेली कामे वेगाने मार्गी लागतील. पदोन्नती-पैसा-प्रतिष्ठा मिळेल. शत्रूंचा पराभव होईल. ज्यांना नवीन घर किंवा कार घ्यायची आहे, त्यांच्यासाठी अनुकूळ काळ आहे. तसेच या काळात गुंतवणूक करू शकतात.


कन्या- कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्याचा बदल फायदेशीर ठरेल. 6 जुलैपूर्वी त्यांना चांगली बातमी मिळू शकते. नोकरी-व्यवसायात यश मिळेल. नफ्याची टक्केवारी वाढेल. सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना यश मिळू शकते.