मुंबई: सूर्य देवाला ग्रहांच्या राजा म्हटलं जातं. या सूर्यदेवाची कुंडलीतील स्थान बदललं की त्याचा परिणाम राशींवर होत असतो. सूर्य देव 16 नोव्हेंबर रोजी तुळ राशीमधून वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर धनु राशीमध्ये प्रवेश करणार आहे. याचा परिणाम 12 राशींवर कसा होणार आहे हे आज जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोव्हेंबरमध्ये सूर्य देवाचा राशी परिवर्तन 5 राशींसाठी लाभदायी असणार आहे. या काळात या राशींची अडकलेली सर्व कामे पूर्ण होतील आणि घरात सुख-समृद्धी येईल.


सिंह (Leo): सिंह राशीच्या लोकांना आर्थिक आणि मालमत्तेशी संबंधित लाभ मिळतील. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. मान-सन्मान वाढेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. घरात सुख-शांती नांदेल.


कन्या (कन्या) : कन्या राशीच्या लोकांना धनलाभ होईल.आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. सूर्याच्या कृपेने आत्मविश्वास वाढेल. आरोग्य चांगले राहील. मानसन्मान मिळेल.


मिथुन: या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यावसायात फायदा होणार आहे. जे लोक सरकारी नोकरीत आहेत किंवा सरकारी क्षेत्रात काम करतात त्यांच्यासाठी हा काळ खूप शुभ राहील. त्यांना मोठा लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थितीही चांगली राहील.


मकर : या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती, करिअर, शिक्षणासाठी हा काळ उत्तम राहील. प्रत्येक कामात यश मिळेल. मेहनतीचं चांगलं फळ मिळेल.


वृषभ: वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे परिवर्तन खूप शुभ राहील. या लोकांना नोकरीत यश आणि मान-सन्मान मिळेल. उत्पन्न वाढण्याची दाट शक्यता आहे. नशीबाची साथ मिळणार आहे.


या राशीच्या लोकांना राहावं लागणार सावध


मेष, तूळ आणि धनु राशीच्या लोकांना मात्र सावध राहावं लागणार आहे. या राशीच्या लोकांचं मोठं नुकसान होऊ शकतं. राशीच्या लोकांची कामे बिघडू शकतात. त्यांचा खर्च वाढू शकतो आणि आरोग्य बिघडू शकते. या लोकांनी संयम राखणं महत्त्वाचं आहे.