Ganesh Chaturthi 2023 Shubh Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नक्षत्र आणि ग्रहांच्या हालचालीमुळे शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात. यंदाची गणेश चतुर्थी अतिशय खास आहे. तब्बल 300 वर्षांनी प्रथमच तीन मोठे आणि अतिशय शुभ असे राजयोग तयार झाले आहे. पंचांगानुसार 19 सप्टेंबर मंगळवारी शुक्ल योग, ब्रह्म योग आणि शुभ योग जुळून आले आहेत. त्याशिवाय 17 सप्टेंबरला रविवारी सूर्याचं महागोचर (Sun Transit 2023) होणार आहे. शिवाय शनीची शक्ती जागृत झाल्यामुळे सूर्य शनि राजयोगाचा (surya shani rajyog) काही राशींना फायदा होणार आहे. बाप्पा या मंडळांसाठी धनलाभाचा योग घेऊन आाला आहे. (Surya Shani Rajyoga on Ganesh Chaturthi after 300 years These Lucky Zodiac Signs get money )


गणेश चतुर्थीला 'या' राशी होणार श्रीमंत!


मकर (Capricorn Zodiac)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशींच्या लोकांना गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाची विशेष कृपा बरसणार आहे. तीन विशेष राजयोग या मंडळींना आर्थिक फायदा करणार आहे. व्यवसात नफा मिळणार आहे. प्रवासाचे योग आहेत. गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होणार असून हा काळ गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास दुहेरी फायदा होणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Ganesh Chaturthi 2023 : कसं असावं बाप्पाच्या नैवेद्याचं पान 'हा' पदार्थ अजिबात विसरु नका; नाहीतर...



मिथुन (Gemini Zodiac)


या राशींच्या लोकांवर बाप्पाची विशेष कृपा असणार आहे. या लोकांना धनलाभाचे अतिशय शुभ योग जुळून आले आहेत. तुमचे अडकलेले पैसेदेखली या काळात परत मिळणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम असणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. विवाहित मंडळींसाठी आनंदायी काळ असणार आहे. नातेसंबंध सुधारणार आहे. 


मेष (Aries Zodiac)


गणेश चतुर्थीला जुळून आलेले तीन विशेष राजयोग हे मेष राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांना त्यांच्या मेहनतीचं उत्तम फळ मिळणार आहे. मुलांकडून आनंदाची तर बायकोकडून गोड बातमी कानी पडणार आहे. समाजात तुमचा मान सन्मान वाढणार आहे. करिअरमध्ये तुम्ही उंच शिखर गाठणार आहात. बाप्पाचं आगमन तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Ganesh Chaturthi 2023 : तुमच्या घरात बाप्पा येणार असेल तर 'हे' 21 नियम जाणून घ्या



(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)