Shani Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र गोचरला अतिशय महत्त्व आहे. ग्रहांच्या सरळ आणि उलट हालचालीमुळे 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतो. 18 ऑगस्टला ग्रहांचा राजा सूर्यदेव सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या गोचरमुळे न्याय देवता शनिदेव आणि सूर्यदेव आमनेसामने येणार आहे. शनिदेव आणि सूर्यदेवा या स्थितीमुळे शुभ असा संसप्तक राजयोग निर्माण होणार आहे. (surya shani yuti making samsaptak rajyog in leo these zodiac signs bank balance to raise money )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राजयोग तीन राशींच्या कुंडलीत तयार होतो आहेत. यामुळे त्या राशींच्या लोकांच्या घरी लक्ष्मी येणार आहे. तुम्ही श्रीमंत होणार असल्याचं ज्योतिषशास्त्र पंडीत सांगतात. या भाग्यशाली राशीत तुमची रास आहे का जाणून घ्या. 


वृषभ (Taurus) 


या राशीच्या लोकांसाठी संसप्तक राजयोग खूप भाग्यशाली ठरणार आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असून कुंडलीत तो तिसऱ्या घरात प्रतिगामी आहे.  त्यामुळे तुमच्या पराक्रमात आणि धैर्यात वाढ होणार आहे. परदेशातूनही आनंदाची बातमी मिळणार आहे. आयात-निर्यातीचा व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांच्या पारगमन कुंडलीत सूर्य आणि शनि मिळून कर्काक्ष राजयोग निर्माण होणार आहे. राजकारणात सक्रिय असणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. 


सिंह (Leo)


या राशीच्या लोकांचा संसप्तक राजयोग शुभदायक ठरणार आहे. यांच्या कुंडलीत बुधादित्य राजयोग देखील तयार होत आहे. त्यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे. याशिवाय इतर सुखेही तुमच्या दारी येणार आहेत. जर तुम्हाला व्यवसाय आणखी पुढे न्यायचा असेल तर हा काळ अतिशय उत्तम आहे. मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे शुभ योग जुळून आले आहेत. कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना यश मिळणार आहे. 


वृश्चिक (Scorpio)


या राशीच्या लोकांचं नशीब देखील संसप्तक राजयोगाने उजळून निघणार आहे. तुमच्या पारगमन कुंडलीत मंगळ लाभदायक स्थितीत असल्याने तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होणार आहे. विशेष म्हणजे कुंडलीतील दहाव्या घरात बुधादित्य राजयोग तयार होतोय.  त्यामुळे नोकरी -व्यवसायात यश प्राप्त होणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Surya Gochar 2023 : बस काही दिवस! श्रावणात सूर्याचं सिंह राशीत प्रवेशामुळे 5 राशी होणार लखपती


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)