Surya Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्याला मानवाचा आत्मा असतो असं म्हटलं जातं. पण हा आत्मा दूषित झालं संपूर्ण जीवन अंधारमय होतं. कुंडलीतील सूर्य मजबूत असेल तर वैभव आणि समृद्धीने आयुष्य सूर्याप्रमाणे चमकून जातं. जर हाच कुंडलीतील सूर्य कमजोर असेल तर तो माणूस गरीब होतो आणि आरोग्याच्या समस्या उद्ध्भवस्त होतं. ज्योतिष पंडित सांगतात की सूर्यदेवामुळे तीन प्रकारचे राजयोग तयार होत असतात. या राजयोगामुळे जाचकाची आयुष्यात अपार पैसा आणि प्रतिष्ठा प्राप्त होते.  (surya yoga three auspicious yog Vasi Yoga Ubhayachari Yoga and Vesi Yoga in Astrology)


सूर्याचा पहिला राजयोग - वेशी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुंडलीमध्ये सूर्य ग्रहाच्या बाजूला कोणताही ग्रह असतो तेव्हा वेशी योग तयार होतो. पण पंडित असंही सांगतात की, सूर्य शेजारी चंद्र, राहू किंवा केतू हे ग्रह कधीच नसावे. तरच तुम्हाला वेशी राजयोग फलदायी ठरतो. हा राजयोग ज्यांच्या कुंडलीत तयार होतो त्या जाचकाला चांगला वक्ता बनवतो. शिवाय त्याला श्रीमंत करतो. अशा लोकांना आयुष्याच्या सुरुवातीला मोठ्या अडचणींचा सामन केलेला असतो. पण नंतर या लोकांच्या आयुष्यात अपार संपत्ती आणि प्रसिद्धी प्राप्त होते. मात्र या लोकांनी खाण्यापिण्यावर विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. पंडित असंही सांगतात की, या लोकांनी गूळ जरुर खाल्ला पाहिजे. 


सूर्याचा दुसरा राजयोग - वाशी 


जेव्हा सूर्याच्या मागील घरात कोणताही ग्रह असतो तेव्हा वाशी योग जुळून येतो. यावेळीही चंद्र, राहू किंवा केतू हा ग्रह नसावा. तरच हा योग शुभ लाभदायक ठरतो.  हा योग व्यक्तीला बुद्धिमान, ज्ञानी आणि धनवान करतो. असे लोक राजासारखं आयुष्य जगतात. वाशी योगामुळे या व्यक्तींना परदेश वारीचे योग असतात. कुंडलीतील योगामुळे ही लोक घरापासून दूर जाऊन त्यांना भरपूर यश प्राप्त होतो. ज्यांच्या कुंडलीत हा योग असतो त्यांनी सूर्याला जल अवश्य अर्पण करावं. तसंच, झोपण्यासाठी लाकडी पलंगाचा वापर करावा, असं पंडीत सांगतात. 


सूर्याचा तिसरा राजयोग - उभयचारी योग 


सूर्याच्या पहिल्या आणि शेवटच्या दोन्ही घरांमध्ये चंद्र, राहू आणि केतू हे ग्रह सोडून दुसरे ग्रह असतात तेव्हा उभयचारी योग तयार होतो.  हा राजयोग आल्याने व्यक्ती अगदी लहान जागेतून खूप शिखरावर पोहोचतो.  कुंडलीतील या राजयोगामुळे त्या व्यक्तीला त्याच्या कार्यक्षेत्रात खूप प्रसिद्धी होतात. या राजयोगामुळे प्रत्येक अडचणीतून ही लोक सहज बाहेर पडतात. व्यक्तीला राजकारण आणि प्रशासनात मोठी पदंही बहाल होतात. पंडितानुसार अशा लोकांनी रविवारी उपवास करावा. तसंच लाल रंगाचा रुमाल सोबत ठेवावा. 


हेसुद्धा वाचा - Shani Margi 2023 : बस अजून काही दिवस! मार्गी शनिमुळे 3 राशींवर धनवर्षाव


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)