मुंबई : स्वप्नांबद्दल समाजातील लोकांमध्ये आजंही विविध गैरसमज दिसून येतात. काहीजण स्वप्नांना निव्वळ योगायोग समजतात तर काहीजण त्यामागील लपलेले अर्थ शोधतात आणि काही जण रात्री पडलेल्या स्वप्नाला स्वत:शी जोडण्याचा प्रयत्न करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वप्नात आपण अनेक गोष्टी पाहतो. यापैकी काही गोष्टी या भीतीदायक असतात किंवा काही आनंददायी असतात. पण स्वप्नांमध्ये एखादी गोष्ट किंवा व्यक्ती पाहण्याचा नेमका अर्थ काय असतो? तुम्ही कधी विचार केलाय का की, एखाद्या मुलीला स्वप्नात पाहणं म्हणजे काय? स्वप्नातील पवित्र शास्त्रात मुलींना विविध रूपांमध्ये पाहिलं असता त्याचा काय अर्थ होतो हे आज जाणून घेऊयात.


जर एखादी स्त्री स्वप्नात बुरखा घालून दिसत असेल तर


जर तुम्ही एखाद्या स्त्रीला स्वप्नात बुरखा किंवा मुखवटा घालून पाहत असाल तर तुमच्यासाठी चांगलं मानू नका. स्वप्नशास्त्रानुसार, जवळचा नातेवाईक किंवा ओळखीचा माणूस तुम्हाला फसवू शकतो असा स्वप्न शास्त्राचा विश्वास आहे. यासाठी तुम्ही सावध असणं आवश्यक आहे.


सुंदर मुलगी स्वप्नात हसताना दिसत असेल तर


हसत असलेली सुंदर मुलगी कोणाला आवडत नाही. पण जेव्हा आपल्याला समजतं की, ते फक्त एक स्वप्न आहे, तर आपला मूड ऑफ होतो. परंतु हे एक चिन्ह आहे की, आपल्या करिअरमध्ये, नोकरीमध्ये आणि व्यवसायात काहीतरी चांगलं होणार आहे.


एखादी स्त्री स्वप्नात लाल पदर घेऊन दिसते


स्वप्नात अशी सुंदर वधू पाहता तेव्हा आनंद होतो हे स्वाभाविक आहे. स्वप्नातील शास्त्रानुसार, अशा स्वप्नांचं लक्षण असू शकतं की, आपल्या घरात लवकरच एक चांगली बातमी येणार आहे. कदाचित एखादी स्त्री आई होणार असल्याची बातमी मिळू शकते.