हिंदू शास्त्रात जपतपाचं महत्त्व फार पूर्वापार सांगितलं आहे. भगवंताचा नापजप केल्याने भक्तांचे कष्ट दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धीचा येते शास्त्राची मान्यता आहे. अनेक वर्षांपासून ऋषि-मुनि जपतप करतात. अस म्हटलं जातं की जप करताना हातात जपमाळ असण अतिशय महत्त्वाच आहे. मंत्रांच्या उच्चारणासोबत माळेचा जप करण अतिशय महत्त्वाच असतं. जपमाळेत 108 मणी असतात. ते मणी संपेपर्यंत जप केला जातो. भगवंताची जपमाळ जपताना काही विशिष्ट गोष्टींच पालन करण अत्यंत आवश्यक आहे अन्यथा जपाचे अशुभ परिणाम पाहायला मिळतात.
जपमाळ करताना कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी जाणून घेऊया. 


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    शास्त्रानुसार आपण ज्या माळेवर जप करतो त्याचा एकही मणी तुटलेला असता कामा नये. अशा माळेवर जप केल्यास त्याचे विपरीत परिणाम पाहायला मिळतात. माळेतील एखादा मणी तुटल्यास मणी बदलून जप करावा. 

  • आपण ज्या माळेवर जप करतो त्या माळेतील दोन मण्यांमध्ये गाठ असणं अत्यंत आवश्यक आहे. गाठ नसलेली माळ शुभफळ देत नाही.

  •  शास्त्रानुसार आपण धारण केलेल्या माळेने जप करण वर्ज्य मानलं जातं त्याचप्रमाणे जपाची माळ धारण करणसुद्धा अशुभ मानलं जातं. 

  • प्रत्येकाची जपाची माळ वेगळी असावी. एकमेकांची जपमाळ वेगळी असावी.

  • ज्योतिषशास्त्रानुसार जपमाळ नेहमी झाकलेली असावी. ती अन्य व्यक्तीला दिसता कामा नये. 

  • जप करताना अनामिका आणि अंगठ्याने माळ धरून मध्यम बोटाने मणी सरकवावेत.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)