Ram Mandir Pran Pratishtha :  प्रत्येक जण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे तो क्षण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. रामलल्लाच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी सजली आहे. आजपासून अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. आजपासून 22 जानेवारीपर्यंत अनेक धार्मिक विधी करण्यात येणार आहे. रामलल्लाच्या मूर्तीच्या गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी अनेक धार्मिक विधी या 7 दिवसांमध्ये करण्यात येणार आहेत. (That historic ceremony starts today Pran Pratistha Ritual of Ramlalla in Ram Mandir Ayodhya till January 22)


प्रभू राम गुलाबाच्या पलंगावर झोपतील 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजपासून सुरू होणाऱ्या धार्मिक विधींमध्ये रामलल्लाच्या मूर्तीच्या विग्रह विधी करण्यात येणार आहे. त्यासोबत गर्भगृहात रामलल्ला मूर्तीचा प्रवेश, गणेशाची पूजा, यज्ञकुंडाची स्थापना, गर्भगृहाचं पावित्र्य, शय्येचा निवास आणि त्यानंतर सिंहासनावर मूर्तीची प्रतिष्ठापना असे धार्मिक विधी संपन्न होणार आहे. 


त्याशिवाय फलाधिवासामध्ये मूर्ती फळांमध्ये ठेवण्यासाठीही पूजा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे रामलल्ला यांच्या निद्रेसाठीही व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठीही एक विधी करण्यात येणार आहे. या विधीमध्ये रामलल्ला यांना नव्याने बनवलेल्या गुलाबाच्या पलंगावर झोपवले जाणार आहे. त्यासाठी खास गादी, रजाई, बेडशीट, उशी आदी साहित्यही तयार केलं गेलं आहे. 


हे प्रमुख औपचारिक आचार्य विधी !


श्री राम जन्मभूमी ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार विद्वान आचार्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा विधी करणार आहेत. यामध्ये आचार्य गणेशवर शास्त्री द्रविड, प्रमुख आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित, अरुण दीक्षित, सुनील दीक्षित, दत्तात्रेय नारायण रताटे, गजानन जोतकर, अनुपम दीक्षित यांचा समावेश आहे. 


श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितलं की, प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. 22 जानेवारीला कूर्म द्वादशीच्या दिवशी मृगाशिरा नक्षत्रात रात्री 12:29 वाजून 8 सेकंद ते 12:30 मिनिटे 32 सेकंद या वेळेत मूर्तीचा अभिषेक करण्यात येणार आहे. काळ्या खडकापासून बनवलेली रामलल्लाची मूर्ती 51 इंच उंच असून वजन 150 ते 200 किलो दरम्यान आहे. ही मूर्ती भगवान रामाच्या 5 वर्षांच्या बालस्वरूपाची असून धनुष्यबाणांनी सुसज्ज अशा स्वरुपात आहे. 


16 जानेवारी : प्रयासचित आणि कर्मकुटी पूजन
17 जानेवारी : मुर्तीचा परीसर प्रवेश, गर्भगृहाचे शुद्धीकरण 
18 जानेवारी (संध्याकाळी) : तीर्थपूजन, जलयात्रा आणि गांधधिवास
19 जानेवारी (सकाळी) : औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास
19 जानेवारी (संध्याकाळी) : धनाधिवास
20 जानेवारी (सकाळी) : शर्कराधिवास, फलाधिवास
20 जानेवारी (संध्याकाळी) : पुष्पाधिवास
21 जानेवारी (सकाळी) : मध्याधिवास
21 जानेवारी (संध्याकाळी) : शैयाधिवास



असे असतील विधी!


16 जानेवारी 2024 : आजपासून रामललाच्या मूर्तीच्या निवासासाठी विधीला सुरुवात
17 जानेवारी 2024 :रामलल्लाची मूर्तीची नगर प्रदक्षिणा काढणार
18 जानेवारी 2024 : अभिषेक विधीला सुरुवात होणार. मंडप प्रवेश पूजा, वास्तुपूजा, वरुण पूजा, विघ्नहर्ता गणेश पूजा आणि मर्तिक पूजा 
19 जानेवारी 2024 : राम मंदिरात यज्ञ अग्निकुंड स्थापन आणि आग विशिष्ठ पद्धतीने पेटवली जाईल.
20 जानेवारी 2024 : राम मंदिराचे गर्भगृह 81 कलशांनी पवित्र करण्यात येईल. ज्यामध्ये विविध नद्यांचे पाणी जमा करुन वास्तुशांती विधी 
21 जानेवारी 2024 : यज्ञविधीमध्ये, विशेष पूजा आणि हवन दरम्यान, रामलल्लाला  125 कलशांसह दिव्य स्नान 
22 जानेवारी 2024 : मध्यकाळात मृगाशिरा नक्षत्रात रामलल्लाची महापूजा
22 जानेवारी 2024 : सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा