Astrology:  राशीनुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा भिन्न असतो. यामुळे कुंडलीच्या आधारे आपण संबधीत व्यक्तीचा स्वभाव जाणून घेऊ शकतो. यासाठीच लग्न जुळवताना देखील मुला मुलींच्या कुंडल्या मॅच केल्या जातात. दोघांचे किती गुण जुळतात यावरुन लग्न जुळवण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र, काही राशी अशा आहेत की  'या' राशीच्या तरुणींचा स्वभाव कुणालाच कळणार नाही. यांच्या स्वभाव जाणून घेणे फारच कठीण आहे. या राशीच्या मुलींचे लव्ह लाईफ देखील गोंधळलेले असते.
एखाद्या मुलीच्या प्रेमात पडल्यावर अथवा तिच्याशी लग्न जुळवण्याचा विचार करत असताना तिचा स्वभाव जाणून घेण्याची उत्सुकता असते. तुम्ही कुंडली आणि राशीभविष्याच्या आधारे एखाद्या मुलीचा स्वभाव जाणून घेण्याचा प्रय्तन करत असाल तर सावधान. कारण, काही राशी अशा आहेत की मुलांचा स्वभाव जाणून घेणे फारच अवघड आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 वृश्चिक (Scorpio), सिंह (Leo), मिथुन (Gemini) आणि मीन (Pisces) या राशीच्या तरुणी खूपच रागीट आणि तापट स्वभावाच्या असतात. तसेच लव्ह लाईफ देखील फार काळ टिकत नाही. 


वृश्चिक (Scorpio)


वृश्चिक (Scorpio) राशीच्या महिला आमइ तरुणी खूपच आकर्षक असतात. कुणीही यांच्याकडे लगेच आकर्षित होते. या राशीच्या मुली बोलक्या स्वभावाच्या असतात. बोलताना त्या कोणतेही तारतम्य बाळगत नाहीत. बोलताना त्या सर्व मर्यादा ओलांडतात. या राशीच्या महिला फारच खुनशी स्वभावाच्या असतात. त्यांच्यात सुडाची भावना असते ही खूपच घातक गोष्ट आहे. राग आल्यावर त्यांचे रागावर नियंत्रण राहत नाही. राग आल्यावर त्या नुकसानदायी देखील ठरू शकतात.


सिंह (Leo)


सिंह (Leo) राशीच्या मुली कोणत्याही यशस्वी व्यक्तीला अयशस्वी बनवू शकतात. त्यांच्यात खूप ऊर्जा असते. त्या दिसायला फारच  सुंदरही असतात. यांच्याकडे सहज कुणीही आकर्षित होते. अनेक लोक यांच्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकतात. मात्यार त्या याचा फायदा घेत ते लोकांचा गैरवापर करतात.


मिथुन (Gemini) 


मिथुन राशीच्या स्त्रिया तत्त्वानुसार त्यांचे जीवन जगतात. त्यांचे हेच वागणे कधीकधी अडचणीचे कारण बनते. त्यांचा प्रेमावर फारसा विश्वास नसतो.  त्यामुळे या राशीच्या महिलांचे प्रेमसंबंध फार काळ टिकत नाहीत. स्वतःच्या फायद्यासाठी या महिला कोणाचाही विश्वास तोडू शकतात.


मीन (Pisces) 


मीन राशीच्या महिलांचा स्वभाव सतत बदलत राहतो. त्यांच्या फायद्यानुसार ते लोकांसोबतचे वर्तन बदलतात. या राशीच्या महिलांना समजून घेणे फारच कठिण आहे. या राशीच्या महिला सतत लोकांकडून सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. त्या कोणालाही फटकळपणे बोलतात.