सावधान... 8 राशींच्या व्यक्तींसाठी पुढचे 33 दिवस कठीण...
जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी?
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीतील प्रत्येक बदलाचा चांगला किंवा वाईट परिणाम होतो. पण हा बदल जर शनीच्या स्थितीत असेल तर त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. त्याचाच परिणाम 8 राशींवर दिसणार असल्याचं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जात आहे. याचे परिणाम पुढचे 33 दिवस या आठ राशींवर जाणवतील, त्यामुळे 8 राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप कठीण जाणार आहे.
कोणत्या आहेत त्या आठ राशी
मेष (Aries): मेष राशीच्या लोकांसाठी पुढचे 33 दिवस तणावपूर्ण असतील. कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण होतील. कामात रस नसल्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. कामात येणारे अडथळे तुम्हाला त्रास देतील.
मिथुन (Gemini): मिथुन राशीच्या लोकांचे काम मार्गी लागणार नाही. अडथळे पुन्हा पुन्हा येतील. करिअरमध्येही हा काळ आव्हाने घेऊन येईल. कामाचा ताण राहील. ही वेळ संयमाने घ्या.
कर्क (Cancer): कर्क राशीच्या लोकांना नात्याच्या बाबतीत समस्यांना सामोरे जावे लागू शकते. करिअरमध्ये अपेक्षित प्रगती न झाल्याने निराशा येईल. वरिष्ठ आणि सहकाऱ्यांशी संबंध चांगले राहणार नाहीत.
तुळ (Libra): तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ कौटुंबिक, पैसा, करिअरमध्ये अडचणी देईल. तणाव निर्माण होईल. त्यामुळे ही वेळ संयमाने घ्या.
वृश्चिक (Scorpio): वृश्चिक राशीच्या लोकांना प्रत्येक कामात अडथळे किंवा विलंबाचा सामना करावा लागेल. काम करावेसे वाटणार नाही. कामाच्या ठिकाणी एखादी परिस्थिती उद्भवू शकते, जी तुम्हाला मनापासून स्वीकारावी लागेल.
धनु (Sagittarius): धनु राशीसाठी, हा काळ कष्टाचे फळ देणार नाही. यामुळे तुमची निराशा होईल आणि तुम्ही तुमच्या कामात बदल करण्याचा विचारही करू शकता. मेहनतीचं फळ चांगलं मिळेल...