मुंबई : हिंदू धर्मात तुळशीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. तुळशीची नियमित पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येतं, असं मानलं जातं. तुळशीच्या रोपाबद्दल शास्त्रात काही नियम सांगण्यात आलेत. तुळशीची तोडताना, जल अर्पण करताना आणि पूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याचा उल्लेख ग्रंथामध्ये केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर धर्मग्रंथानुसार तुळशीचा उपयोग शिव घराण्यातील पूजा वगळता जवळपास सर्व देवी-देवतांच्या पूजेत केला जातो. तुळशीच्या भोगाशिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते. तुळशीची पानं तोडून जल अर्पण करण्याबाबत शास्त्रात काही खास नियम सांगण्यात आले आहेत. चला हे नियम काय आहेत ते जाणून घेऊया.


तुळशीची पानं तोडण्याबाबतचे नियम


असं मानले जातं की, तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मी देवी वास करते. त्यामुळे तुळशीची पाने तोडताना हात जोडून त्यांची परवानगी घेणं आवश्यक आहे. त्यानंतरच तुळशीची पानं पूजेसाठी तोडली पाहिजेत.


तुळशीची पानं तोडताना चाकू, कात्री किंवा यांसारख्या इतर गोष्टींनी  इत्यादींनी तोडू नयेत.


विनाकारण तुळशीची पानं कधीही तोडू नये. असं मानलं जातं की, जर कोणी असं केलं तर घरामध्ये दुर्दैवाचा सामना करावा लागू शकतो.


तुळशीच्या बाबतीत महत्त्वाची माहिती 


तुळस ज्या ज्या घरात आहे त्यांनी रविवार आणि एकादशीच्या दिवशी तिला जल अर्पण करु नये. असं म्हणतात की या दिवशी तुळस विष्णुसाठी उपवास करते. तुळस कधीच छतावर लावू नका. तिच्या आजुबातूला केर नका टाकू. एकादशी आणि अमावस्येच्या दिवशी तुळचीची पानंही तोडू नका. 


(वरील माहिती सर्वसामान्य मान्यतांवर आधारलेली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)