Shani 2024: शनि,सूर्याच्या स्थितीत मार्चमध्ये होणार बदल, `या` राशींचे प्रगतीचे मार्ग होणार खुले
Shani 2024: ग्रहांच्या स्थितीतील हे मोठे बदल सर्व राशींवरही परिणाम करणार आहे. 14 मार्चला सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे, 15 मार्चला मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल.
Shani 2024: ज्योतिष्यशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. याला ग्रहांचं गोचर असं म्हटलं जातं. मार्च महिना ग्रहांच्या स्थितीसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. मार्चमध्ये केवळ शनी आणि सूर्याची स्थिती बदलणार नाही तर शुक्र, मंगळ आणि बुध यांसारखे अनेक ग्रहही इतर राशींमध्ये बदल करणार करणार आहेत.
ग्रहांच्या स्थितीतील हे मोठे बदल सर्व राशींवरही परिणाम करणार आहे. 14 मार्चला सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे, 15 मार्चला मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल. कुंभ राशीत अस्त असलेल्या शनीचा (Shani) 18 मार्चला पुन्हा उदय होणार आहे. यामध्ये शनी आणि सूर्याच्या या बदलामुळे काही राशींच्या व्यक्तींना अचानक फायदा होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणच्या आहेत.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीसाठी मार्च महिना खूप खास ठरणार आहे. घरात आनंदाचं वातावरण राहणार आहे. नोकरदार लोकांना या काळात नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. या महिन्यात संपत्ती मिळवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न पूर्णपणे यशस्वी होतील. कोणत्याही व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना चांगला सौदा मिळू शकतो.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी मार्च महिना अनेक चांगले बदल घेऊन येणार आहे. भागीदारांसोबतचे संबंध अधिक चांगले होणार आहेत. या महिन्यात तुमच्या आयुष्याचा जोडीदार मिळू शकेल. तुम्ही तुमची सर्व कामं तुम्ही पूर्ण उर्जेने पूर्ण करू शकाल. तुम्ही कुठेतरी फिरायला जाऊ शकता. या राशीचे लोक धार्मिक कार्यात व्यस्त राहणार आहे.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शनीची स्थिती लाभदायी ठरेल. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या महिन्यात लाभ मिळेल. तुम्ही प्रत्येक काम उत्साहाने पूर्ण कराल. प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. तुमची प्रलंबित असलेली महत्त्वाची कामं पूर्ण होणार आहे. करिअरमध्ये काही अडचण असेल तर ती या वर्षात सुटणार आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )