सूर्य, शनी आणि बुध ग्रहाची होणार युती; `या` राशींना मिळू शकतो अपार पैसा
बुध ग्रह अस्त अवस्थेत कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. सध्या कुंभ राशीत सूर्य आणि शनि आहेत. या तिन्ही ग्रहांच्या स्थितीमुळे काही राशींच्या आयुष्यात सुखाचे क्षण येणार आहे.
ग्रहांच्या गोचरमुळे अनेक ग्रहांची एक राशीमध्ये युती होते. 20 फेब्रुवारीला बुध कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत सूर्य आणि बुध मिळून बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. याचसोबत शनी आणि बुध यांचा संयोग होणार आहे. यावेळी सूर्य, बुध आणि शनीच्या या स्थितीमध्ये काही राशींना खूप फायदा होणार आहे.
बुध ग्रह अस्त अवस्थेत कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. सध्या कुंभ राशीत सूर्य आणि शनि आहेत. या तिन्ही ग्रहांच्या स्थितीमुळे काही राशींच्या आयुष्यात सुखाचे क्षण येणार आहे. यामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे ते जाणून घेऊया.
मेष रास
करिअरच्या दृष्टीने या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण खूप चांगले राहील. यावेळी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मिळणाऱ्या प्रमोशनमुळे तुम्हाला खूप आनंद होणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून तुम्हाला मोठा लाभ मिळू शकतो. जोडीदारासोबतचे संबंध खूप मजबूत असणार आहे. त्याचवेळी पदोन्नतीची शक्यता आहे.
वृषभ रास
हा काळ या राशीच्या व्यक्तीसाठी प्रगती आणि यश देणारा असणार आहे. करिअर आणि व्यवसायात फायदा होईल. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो. उत्पन्नाच्या स्त्रोतांसह त्यांची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. यावेळी त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत. तुम्हाला गुप्त शत्रूंवरही विजय मिळवता येणार आहे.
कर्क रास
बुध, सूर्य आणि शनि एकत्र आल्याने या राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. पैसे कमवण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. व्यावसायिकांना चांगला फायदा होणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. उद्योगपती त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर देणार आहेत. या राशीच्या व्यक्तींना अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात.
धनु रास
या राशीच्या लोकांना चांगले लाभ आणि यश देणार आहे. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. यावेळी चांगला नफा मिळणार आहे. नोकरदार लोकांना गुंतवणुकीद्वारे चांगला नफा मिळू शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल आणि कुटुंबात आनंद राहील.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)