अक्षय तृतीयेला ही ५ कामे केल्याने मिळतील शुभ फळे!
अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते.
मुंबई : अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. पण काही कारणास्तव तुम्ही सोने खरेदी करु शकाल तर निराश होण्याची गरज नाही. सोने नाही तर या गोष्टींची खरेदीही शुभ ठरेल.
पूजा करा
या दिवशी मुहूर्ताच्या दिवशी पूजा करा. अगदी विधीवत पूजा करणे नाही जमले तर साधी पूजा केली तरी चालेल. मात्र ती मनापासून असावी. त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला पुण्य लाभेल.
अन्नदान करा
गरीबांना अन्नदान करण्याचे खूप महत्त्व आहे. प्राण्यांना खायला घाला. त्यामुळे कुटुंबात सुख लाभेल आणि प्रगतीचे मार्ग खुले होतील.
गाडी खरेदी करा
गाडी घेण्याचा प्लॅन असेल तर या दिवशी गाडी खरेदी करणे शुभ ठरेल.
नवीन बिजनेस
नवीन बिजनेस सुरु करण्यासाठी हा दिवस उत्तम ठरेल.
झाडं लावा
या दिवशी झाडं लावणं खूप शुभ मानले जाते. झाडं लावल्याने तुम्ही देता त्यापेक्षा अधिकच तुम्हाला परत मिळते.