नवी दिल्ली : भारतामध्ये साजऱ्या करण्यात येणाऱ्या सणांपैकी मोठा सण म्हणजे दिवाळी. संपूर्ण देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात येते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या वर्षी १९ ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. दिवाळीत रोशनाईला एक वेगळचं महत्व आहे. दिवाळीत प्रत्येक घरात पणत्या, कंदील आणि दिव्यांच्या माळा लावल्या जातात. रोशनाई करण्यासाठी पारंपारिक पद्धतीने पणत्या लावल्या जातात.


दिवाळीत दिव्यांचं एक वेगळचं महत्व आहे. असं मानलं जातं की, दिवाळीत दिव्यांनी रोशनाई केल्यास गणपती बाप्पा आणि लक्ष्मी देवता प्रसन्न होतात. तसेच दिव्यांना एक शुभ संकेतही मानलं जातं. चला तर मग, जाणून घेऊयात दिवाळीच्या मुहूर्तावर कुठल्या ठिकाणी दिवे लावावेत.


दिवाळीत लक्ष्मी देवीच्या फोटोसमोर एक दिवा लावावा. तसेच संपूर्ण घरात पणत्या लावाव्यात. घराच्या मुख्य दरवाज्यात दिवा नक्की लावावा. तसेच घरातील मंदिरातही दिवा लावावा. असे केल्यास घरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण राहतं.


घरासोबतच बाहेरही दिवे लावावेत. घरातील प्रत्येक रुममध्येही दिवे लावावेत. दिवाळीच्या रात्री पिंपळाच्या झाडाखाली दिवा पेटवावा असेही काहीजण मानतात. असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते असे बोलले जाते.