COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Tips For Good Start In New Year 2024: येणारं नवीन वर्ष आनंदी आणि सुख-समृद्धीने जावं असं प्रत्येकाला वाटत असतं.पण घरातील अशा काही वस्तू आहेत , ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा  पसरते. यामुळे घरात आर्थिक अडचणी देखील निर्माण होतात.हे टाळण्यासाठी घरातील या काही वस्तू आहेत, ज्या तुम्ही नवीन वर्ष सुरु व्हायच्या अगोदर लांब केल्या पाहीजे. वास्तुनुसार नवीन वर्षाच्या आधी घरातून कोणत्या वस्तू काढून टाकाव्यात हे सांगणार आहोत.
 


सुकलेली  झाडे
वास्तुशासत्रानुसार घरामध्ये सुकलेली आणि कोरडी झाडं ठेवणं अशुभ मानलं जातं. नवीन वर्ष आनंदात घालवण्यासाठी घरातील सुकलेली झाडं, कुंड्या घरात ठेवू नका. 


बंद पडलेले घड्याळ 
घरात एखादी बंद वस्तू ठेवणं ही चांगली गोष्ट मानली जात नाही. असं म्हणतात जर बंद घड्याळ घरात असेल तर आपली वेळ सुद्धा थांबते. त्यामुळे घरातील बंद घड्याळ दुरुस्त करावं किंवी नवीन घ्यावं. 


फुटलेले फोटो
नवीन ट्रेंडनुसार अनेकजण अॅस्थेटीक फोटोंना घेऊन अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फोटो घरात जमा करतात. घरामध्ये फुटलेले फोटो किंवा तुटलेले फोटो लावणं खूप अशुभ मानलं जातं. 


तुटलेला आरसा 
घरामध्ये तुटलेला आरसा किंवा काच असणं हे अशुभ मानलं जातं. यामुळे घरात नकारात्मकता पसरते. यामुळे घरात क्लेष निर्माण होतो. घरात सतत भांडणं होतात.



जुणे व फाटलेले कपडे
जुण्या कपड्यांसोबत अनेकांच्या वेगवेगळ्या आठवणी जोडलेल्या असतात.   पण वास्तुशासत्रानुसार घरामध्ये घरात मळलेले, फाटलेले कपडे जास्त दिवस ठेवणं अयोग्य. मानलं जातं. यामुळे घरातील जुणे कपडे जास्त वेळ घरात ठेवू नका. 



(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)