Panchang 10 October 2024 in marathi : आज नवरात्रीचा अतिशय महत्त्वाचा दिवस महाअष्टमी आहे. आज कन्या पूजन आणि हवन याला विशेष महत्त्व आहे. तर आज दुर्गादेवीच्या महागौरी रुपाची पूजा करण्यात येते. महागौरीचा रंग अतिशय गोरा आहे. तिला चार हात आहेत आणि आई बैलावर विराजमान आहे. देवी आईचा स्वभाव शांत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं म्हणतात की, महागौरीची पूजा केल्यास आई महागौरीची पूजा केल्याने लग्नात येणारे सर्व संकट दूर होतात. देवी आईच्या आशीर्वादाने उत्तम जोडीदार मिळतो. देवीची पूजा केल्याने येणारे सर्व संकट दूर होऊन सर्व पापांपासून मुक्ती मिळते. देवीच्या आशीर्वादाने सौख्य, ऐश्वर्याची प्राप्ती होते.  


आज पंचांगानुसार (Panchang Today) आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. पंचांगानुसार लक्ष्मी नारायण योग, सुकर्म योग आणि पूर्वाषाद नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र धनु राशीत आहे. (Thursday Panchang)  


तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. गुरुवार हा दिवस भगवान विष्णुला समर्पित आहे. त्यामुळे गुरुवारी श्री स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज यांची पूजा करण्यात येणार आहे. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या.  (Thursday panchang 10 october 2024 panchang in marathi mahagauri Navratri Ashtami Kanya Pujan Navratri 2024 ) 


पंचांग खास मराठीत! (10 october 2024 panchang marathi)


वार - गुरुवार 
तिथी - सप्तमी - 12:33:48 पर्यंत
नक्षत्र - पूर्वाषाढ़ा - 29:41:54 पर्यंत
करण - वणिज - 12:33:48 पर्यंत, विष्टि - 24:26:44 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - अतिगंड - 28:36:06 पर्यंत


 


हेसुद्धा वाचा - Kanya Pujan Navratri 2024 : 10 की 11 ऑक्टोबर कधी आहे कन्यापूजन? जाणून घ्या तिथीपासून शुभ मुहूर्त आणि महत्त्व


 


सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - 06:19:12
सूर्यास्त -17:56:20
चंद्र रास - धनु
चंद्रोदय - 13:05:00
चंद्रास्त - 23:12:59
ऋतु - शरद


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 11:37:08
महिना अमंत - आश्विन
महिना पूर्णिमंत - आश्विन


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त - 10:11:34 पासुन 10:58:03 पर्यंत, 14:50:25 पासुन 15:36:54 पर्यंत
कुलिक – 10:11:34 पासुन 10:58:03 पर्यंत
कंटक – 14:50:25 पासुन 15:36:54 पर्यंत
राहु काळ – 13:34:54 पासुन 15:02:03 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 16:23:22 पासुन 17:09:51 पर्यंत
यमघण्ट – 07:05:40 पासुन 07:52:09 पर्यंत
यमगण्ड – 06:19:12 पासुन 07:46:20 पर्यंत
गुलिक काळ – 09:13:29 पासुन 10:40:37 पर्यंत


 


हेसुद्धा वाचा - Kunkumarchan Navratri 2024: देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय? नवरात्रीत कोणत्या दिवशी करावं? जाणून घ्या संपूर्ण माहिती


 


शुभ मुहूर्त 


अभिजीत - 11:44:31 पासुन 12:31:00 पर्यंत


दिशा शूळ


दक्षिण


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद


चंद्रबल  


मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)