Tilak As Per Vedas Astrology : पूर्वीच्या काळात घरातून बाहेर पडण्याआधी कपाळावर गंध लावण्याची परंपरा होती. आधुनिक युगात ही परंपरा लुप्त होत चालली आहे. पण तुम्हाला कपाळावर गंध का लावायचं त्यामागील कारणं आणि तुमच्या दैनंदिन जीवनातील समस्यांवर उपाय म्हणून योग्य रंगाच गंध तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. गंधातून तुमच्या यशाच गुपित लपवलं असल्याचं ज्योतिषी डॉ. जया मदन यांनी सांगितलं आहे. (tilak on our forehead applied to progress in career control anger and calm Rahu types of tilak on forehead Astrology in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला असो किंवा पुरुष यांनी कपाळावर गंध लावण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. गंध ही कपाळीची शोभा नसून बुद्धीची पूजा असते. सुप्तावस्थेतील तृतीय नेत्र हे कपाळावर असतं. 


योग्य रंगाचं गंध आणि समस्यांवर मात!


ज्योतिषी डॉ. जया मदन यांनी इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने कुठल्या समस्येसाठी कुठल्या रंगाचे गंध किंवा टिळक लावावं हे सांगितलं आहे. जर तुमच्यामध्ये लिडरशीपची कमी असेल तर रोज ऑफिसला जाण्यापूर्वी कपाळावर केशरी रंगाचा गंध लावावं. जर तुम्ही आळशी आहात, तुम्हाला कुठलं ध्येय नसेल तर लाल रंगाचं गंध तुम्ही लावावं, ज्यामुळे तुमचा मंगळ मजूबत होईल. 


हेसुद्धा वाचा - एक दिवा मिटवेल सर्व चिंता! रोगराईसह संकटांचं सावट दूर करण्यासाठी पाहा नेमकी कोणती वात कधी लावाल


तुमच्यामध्ये Communication Skills ची कमी आहे तर तुळशीच्या पानाचा रस कपाळावर लावा. भावनिकदृष्ट्या तुम्ही कमजोर असाल तर लाल गंधात तांदूळ मिक्स करुन लावा. खूप जास्त प्रमाणात नकारात्मक विचार तुमच्या मनात घर करतात त्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी चंदनची टिळक लावा. ज्यामुळ राहू मजबूत स्थितीत येईल आणि तुमच्या मनात सकारात्मक भाव निर्माण होईल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनमध्ये वाढ करायची असेल तर यासाठी केसरच गंध लावावं. 



तुम्हाला जर असं वाटतं की, तुम्ही कुठलंही काम पूर्ण करण्यापूर्वीच सोडून देता. याचा अर्थ तुमचा केतू मजबूत करण्याची गरज आहे. यासाठी तुम्ही रोज हळदीचं गंध लावावं. योग्य गंध, योग्य जागी लावल्यास योग्य कामात प्रगती मिळते. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. को णताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)