एक दिवा मिटवेल सर्व चिंता! रोगराईसह संकटांचं सावट दूर करण्यासाठी पाहा नेमकी कोणती वात कधी लावाल

Astrology : आपण रोज देवघरात, तुळशीजवळ अगदी दारातही सकाळ, संध्याकाळ दिवा लावतो. पण तुम्हाला दिवा लावण्याची योग्य पद्धत आणि कोणती वात कधी लावावी याबद्दल माहिती आहे का? ज्योतिषी डॉ. जया मदन हिने पुण्यप्राप्तीसाठी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

नेहा चौधरी | Updated: Feb 5, 2024, 03:59 PM IST
एक दिवा मिटवेल सर्व चिंता! रोगराईसह संकटांचं सावट दूर करण्यासाठी पाहा नेमकी कोणती वात कधी लावाल title=
Diya will erase all worries Find out exactly which vat to use and when to avoid problems with lamp lighting diyas rules Astrology in marathi

Old oil lamp or Diya Astrology : अंधाराकडून प्रकाशाकडे जावू, तिमिरातून तेजाकडे नेऊ असं आपण म्हणजे. दिवा हा अंधारातून आपल्यालाकडे प्रकाशाकडे घेऊन जातो. म्हणजेच नकारात्मक गोष्टीतून सकारात्मक गोष्टींकडे वाटचाल. आपण प्रत्येक जण घरातील मुख्य दारात, तुळशीजवळ आणि देवघरात देवाच्या नावाने दिवा लावतो. वैदिक ज्योतिषशास्त्रात दिवाचे अनेक उपाय सांगितले आहेत. तर वास्तूशास्त्रात दिवा कुठे आणि कधी लावावा याबद्दल नियम सांगितलेय. पण तुम्हाला घरातील एक दिवा रोगराईसह संकटांचं सावट दूर करण्यासाठी सक्षम असतो. पण त्यासाठी तुम्हाला दिवा लावण्याची योग्य पद्धत माहिती असायला हवी. शिवाय दिव्यामध्ये कुठली वात कधी लावावी हे माहिती असावं. दिव्या आणि वातीबद्दल हमखास आपण चुका करतो. त्यामुळे दिवा लावण्याचे योग्य फळं आपल्याला कधी मिळत नाही. (Diya will erase all worries Find out exactly which vat to use and when to avoid problems with lamp lighting diyas rules Astrology in marathi)

एक दिवा मिटवेल सर्व चिंता! 

ज्योतिषी डॉ. जया मदन यांनी इन्स्टाग्रामवर दिवा आणि वातीसंदर्भात एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये तिने अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगितली आहे. आपण कर्तव्य किंवा परंपरा म्हणून रोज घरात दिवा लावतो. पण त्याची योग्य पद्धत आपल्याला कोणी सांगितली नाही. जया हिने मात्र आपली ही समस्या दूर केली असून तिने सांगितली छोटीशी गोष्ट आपण केल्यास आपल्या घरातील अनेक संकट दूर होती. 

दिव्याबद्दल हमखास आपण 'ही' चूक करतो!

घरात दिव्या लावताना आपण मिळेल तो दिवा लावत असतो. पण ही चूक आपण टाळली पाहिजे. जया म्हणते की, देवघरातील दिवा हा रोज एकच असला पाहिजे. खरं तर वर्षानुवर्षे एकच दिवा देवघरात असला पाहिजे. दिवा हा कुठल्याही धातू म्हणजे सोनं, चांदी, पितळ किंवा तांब्याचा असला तरी चालतो पण तो एकच असावा, असं जया सांगते. यामागील कारण म्हणजे जेव्हा दिवा तुम्ही एकच ठेवता तेव्हा त्यातील फायर मजबूत स्थितीत येतो. यामुळे जेव्हा कोणाची एनर्जी कमी असते किंवा तब्येत ठिक नसते तेव्हा या दिव्याला धुवून त्यात पाणी टाकून देवासमोर प्रार्थना करा आणि नंतर ते पाणी ग्रहण करा. हा उपाय तुम्हाला समस्येतून मुक्ती मिळवून देतो.

कोणती वात कधी लावावी?

दिवा लावताना आपण कधी वात कुठली लावावी याबद्दल नियम पाळत नाही. हाताला मिळेल किंवा घरात जे असेल ती वात घेऊन दिवा लावतो. पण जया म्हणते की, तुम्ही हे चुकीचं करता. तिने कुठली वात कधी लावावी याबद्दल नियम सांगितला आहे. जेव्हा तुम्ही देवतांची पूजा करता हनुमान, राम, विष्णू यांची पूजा करता तेव्हा गोलाकार वातीचा दिवा लावावा.

तर तुम्ही जेव्हा देवीची प्रार्थना करता तेव्हा तुम्हाला लांब वातीचा दिवा लावायला पाहिजे. तसंच माता लक्ष्मीसाठी लाल रंगाची लांब वात लावली पाहिजे. जेव्हा तुम्ही लाल रंगाची वात तूपासोबत लावतात तेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न होते. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. को णताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)