राशीभविष्य २६ जानेवारी : `या` राशीच्या व्यक्तींना चांगली बातमी मिळेल
कसा आहे तुमचा आजचा दिवस...
मेष - नोकरीत अधिकाऱ्यांकडून सहयोग मिळेल. कामाचा व्याप असेल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. धनलाभ होऊ शकतो. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. धार्मिक कार्यासाठी प्रवास होऊ शकतो. तब्येत चागंली राहील.
वृषभ - रखडलेले पैसे मिळू शकतात. पैशांसंबंधी विचार करावा लागेल. कुटुंबियांची मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळेल.
मिथुन - दुहेरी विचारांमुळे कामात मन लागणार नाही. महत्त्वाच्या गोष्टींमध्ये निर्णय घेणं कठीण होऊ शकतं. चिंता राहील. वाद-विवादापासून लांब राहा. नोकरीत बदलीची संधी आहे. खर्च वाढू शकतो. वायफळ खर्च होईल. मानसिक तणाव राहील.
कर्क - नशिबाची साथ मिळेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला आहे. मित्रांसोबत दिवस जाईल. मित्रांच्या मदतीने काम पूर्ण करण्यासाठी मदत होईल.
सिंह - धनलाभाची शक्यता आहे. नोकरीत प्रगती होईल. मुलांकडून सुख, आर्थिक सहयोग मिळेल. जुन्या मित्रांशी भेट होईल.
कन्या - जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कामं वाढू शकतात. महत्त्वाच्या लोकांशी संपर्क वाढेल. नव्या संधी मिळतील. येणाऱ्या दिवसांत आधी केलेल्या कामांमधून प्रगती, फायदा होण्याची शक्यता आहे.
तुळ - तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे. कामं करताना सावध राहा. जोडीदाराशी वाद होऊ शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. स्वत:ला नियंत्रणात ठेवा. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. दिवसभर घाई-गडबड राहिल्याने ताण वाटेल.
वृश्चिक - नवीन जबाबदारी मिळू शकते. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. पैशांच्या स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आवडीच्या व्यक्तीशी अचानक भेट होऊ शकते. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या.
धनु - व्यवसायासाठी नवीन योजना आखू शकता. नवीन कामाची सुरुवात करु शकता. जोडीदारासाठी खर्च करावा लागू शकतो. मित्र, भावंडांची मदत होईल.
मकर - व्यवसायासाठी प्रवास होऊ शकतो. नवीन जबाबदारी मिळू शकते. नोकरीत प्रगती होईल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवाल. तब्येत चांगली राहील.
कुंभ - नोकरीत चांगली कामगिरी कराल. व्यवसायात फायदा होईल. मन प्रसन्न राहील. चांगली बातमी कानावर येऊ शकते. दिवस मनोरंजनात्मक राहील. तब्येतीची काळजी घ्या.
मीन - काम करण्याच्या पद्धतीत बदल करु शकता. कामात मन कमी लागेल. गोंधळ वाढेल. प्रेमसंबंधांमध्ये वाद होऊ शकतो. तुमची मतं, परिस्थिती स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करा.