मेष - आर्थिक व्यवहारांमध्ये सजग राहा. साथीदाराचा फायदा होईल. अर्थार्जनाच्या नव्या वाटा मिळतील. नोकरीची एखादी सुवर्णसंधी तुमच्यासमोर येईल. काही मित्रांना भेटण्याचा योग आहे. तुमच्या मनात सतत काही विचार असतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- चांगल्या विचारांचा तुम्हाला फायदा होणार आहे. काही खास कामं पूर्ण होण्याचा योग आहे. नोकरीच्या वेळात्रकात काही बदल होतील. किंवा तसा विटार कराल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. 


मिथुन- आज तुम्ही काही नवे प्रयोग कराल. आत्मविश्वास वाढलेला असेल. इतरांसोबत ताळमेळ साधाल. कुटुंबीयांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचे बेत आखाल. 


कर्क- आज प्रयत्न केल्यास नोकरी किंवा इतर सर्वच बाबतीत नव्या संधी आणि यश मिळेल. अनेक गोष्टींसाठी सहमती मिळेल. वेळ काढा, काही ठिकाणी तडजोड करा. येत्या काही दिवसांमध्ये अनेक गोष्टी तुमच्या कलाने असतील. 


सिंह- कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनेच तुम्ही पावलं उचलाल. आर्थिक फायदा होण्याच्या दृष्टीने विचार कराल. दृष्टीकोन सकारात्मक ठेवा. कामाच्या ठिकाणी यश आणि धनलाभ होण्याची शक्यता आहे. पदोन्नती किंवा नोकरीची नवी संधी मिळेल. 


कन्या- ऑफिसमध्ये तुम्हाला बऱ्याच अंशी यश मिळेल. करिअरशी संबंधीत काही गोष्टींवर तोडगा निघेल. नोकरीच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. व्यापार करणाऱ्यांना यश मिळेल. 


तुळ- स्वत:वर विश्वास ठेवा. गरज पडल्यास प्रवास करा. काही नवे अनुभव मिळतील. जुन्या गोष्टी विसरण्याचा विचार करा. सहनशीलता वाढेल. 


वृश्चिक - नोकरीच्या ठिकाणी एखादी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. एखादं काम सुरु करण्याची इच्छा होईल. सकारात्मक राहा. कामाचा व्याप वाढेल. आज अशा काही व्यक्तींना भेटाल, ज्यांचा तुमच्या जीवनावर प्रभाव असेल. 


धनु- जास्तीत जास्त कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नव्या गुंतवणुकीचा फायदा होईल. दिवस क्षणात व्यतीत होईल. नोकरी किंवा व्यवसायात बदल करण्याचा प्रयत्न कराल. 


मकर- मोठ्या धीराने मेहनत केली होती, त्याचं फळ आज मिळणार आहे. किंबहुना गोष्टी तुमच्या मनासारख्याच होणार आहेत. जुन्या मित्रांना भेटण्याची संधी आहे. विचाराधीन कामं पूर्ण होतील. नोकरीच्या ठिकाणी काही नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. 



कुंभ- कही महत्त्वाचे बदल करण्याची शक्यता आहे. काही गुढ गोष्टींकडे तुमचा कल असेल. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा योग आहे. दृष्टीकोन सकारात्मक ठेवा. 


मीन- चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. नव्या संधींसोबत काही मोठे निर्णय़ही घ्यावे लागतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला एखादा प्रवास करावा लागू शकतो.