मेष- दिवस फायद्याचा असेल. शक्य असेल तितकं स्वत:च्याच कामावर लक्ष द्या. महत्त्वाकांक्षा परमोच्च शिखरावर असतील. राजकीय वर्तुळातील व्यक्तींना फायदा होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- इतरांशी व्यवहार करतेवेळी तुम्ही पूर्णपणे विचार करा. सोबत काम करणाऱ्यांची साथ लाभेल. धैर्य ठेवा. शांतता पाळा, इतरांकडून तुमची प्रशंसा होणार आहे. 


मिथुन- व्यापार किंवा कामाच्या ठिकाणी काही नवे बेत आखण्यास सुरुवात करा. एखादं महत्त्वाचं काम हाती घ्या. काही गोष्टींची अगदी नव्याने सुरुवात कराल. 


कर्क- करिअरच्या दृष्टीने काही महत्त्वाची पावलं उचलाल. समाजाकित वर्तुळात सक्रिय असाल. प्रेमसंबंधांमध्ये नवी सुरुवात होणार आहे. नव्या वाहनाची खरेदी कराल. 


सिंह- तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. आर्थिक वाद मिटून एखादी नवी सुरुवात कराल. सामाजिक क्षेत्रात बऱ्याच अंशी यशस्वी ठराल. कामाच्या क्षेत्रात प्रगती होईल. धनलाभ होण्याची चिन्हं आहेत. 


कन्या- अनेक बाबतीत दिवस सामान्य असेल. स्वत:च्या सन्मानासाठी लढा द्याल. सावध राहा. अर्थार्जनात वाढ होईल. 


तुळ- धनलाभाचा योग आहे. प्रत्येक कामाचा तुम्हाला फायदाच होणार आहे. काल्पनिकतेपासून दूर राहा. संधी मिळाल्यास एटक्याने विचार करा. 


वृश्चिक- आजचा दिवस व्यग्र असेल. काही चांगल्या संधी येत्या काळात तुमच्या समोर येतील. दिवस चांगला आहे. प्रकृती सुधारेल. 


धनु- तुमच्याकडे खूप सारं काम असेल. बऱ्याच कामांमध्ये यशस्वी ठराल. तुमची प्रतिमा चांगली असेल. जुन्या मित्रांना भेटण्याचा योग आहे. आरोग्य चांगलं असेल. 


मकर- दूरच्या एखाद्या विद्वानाशी ओळख होईल. अनेक कामं पूर्ण होतील. काही नवे अनुभव मिळतील. अभ्यासात मन रमेल. 



कुंभ- धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. पगारात वाढ होईल. आर्थिक बाबतीत तुम्हाला गरज असल्यास आज ती पूर्ण होईल. व्यापार चांगला असेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. 


मीन- इतरांचा सल्ला मिळेल. सर्व परिस्थिती तुमच्या अटोक्यात असेल. अविवाहितांसाठी आनंदाचा काळ आहे. नव्या व्यक्तींना भेटण्याची संधी आहे.