मेष- कामाचा व्याप वाढेल. व्यापारामध्ये फायदा होण्याची चिन्हं आहेत. दिवस शांततापूर्ण असेल. अडचणींवर मात करण्याचा बेत आखाल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- जुन्या अडचणी दूर जाणार आहेत. स्वत:ची काळजी घ्या. कुटुंबाची काळजी घ्या. मित्रपरिवाराचं सहकार्य मिळेल. 


मिथुन- धनलाभ होण्याची शक्यता आहे. एखादं असं काम कराल ज्याचा फायदा तुम्हाला दीर्घ काळासाठी मिळेल. एखादी शुभवार्ता मिळेल. आजचा दिवस आनंददायी असेल. 


कर्क- अचानक होणारा धनलाभ सुखावह असेल. अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. कोणा एका व्यक्तीशी मतभेद होईल. पण, तो वाद लगेचच मिटेल. अधिकाधिक वादांवर तोडगा निघेल. 


सिंह- आर्थिक परिस्थितीत मोठा बदल होणार आहे. ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. तणावपूर्ण परिस्थितीचं सावट दूर जाणार आहे. 


कन्या- नोकरीच्या ठिकाणी एखादी नवी सुरुवात कराल. जमीन खरेदीचे निर्णय घ्याल. कौटुंबीक कार्यक्रमांमुळे आनंदी असाल. 


तुळ- विचाराधीन कामं पूर्ण होतील. अडचणी अगदी सहजपणे .दूर होतील. गुंतवणुकीमुळे फायदा मिळेल. उधार घेतलेले पैसे परत मिळतील. 


वृश्चिक- आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. कामाच्या ठिकाणी नव्या ओळखी होतील. नशिबाची साथ मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. 


धनु- नोकरी आणि करिअरच्या दृष्टीने प्रगती कराल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. इतरांच्या मदतीसाठी तत्पर राहा. 


 


मकर- एखादं महत्त्वाचं काम हाती घ्याल. जुनी कामं मार्गी लावाल. कामात तुम्हाला फायदाच होणार आहे. दिवस शांततेत व्यतीत होईल. 


कुंभ- आज धीराने काम करा. दिवसभर पैशांचाच विचार करत असाल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. दैनंदिन कामांचा व्याप वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. विचार कमी करा. 


मीन-आज केलेल्या प्रत्येक कामाचा तुम्हाला फायदा होणार आहे. अडकलेले पैसे परत मिळतीत. व्यवहार चातुर्याचा फायदा होईल. मनमिळाऊ स्वभाव तुम्हाला आनंद देऊन जाईल.