Horoscope Today 16 June : गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, पाहा काय सांगतंय आजचं राशीभविष्य. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष- एखादी शुभवार्ता तुम्हाला कळेल. रागावर ताबा ठेवा. तिखट तेलकट पदार्थ टाळा. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. 


वृषभ - कुटुंबीयांसमवेत एखाद्या नव्या गोष्टीचा अनुभव घेण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत. 


मिथुन- सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असाल तर आज चांगली संधी तुम्हाला मिळणार आहे. नोकरीच्या नव्या संधी तुमच्या आयुष्याला कलाटणी देणार आहे. 


कर्क- कामाच्या ठिकाणी असणारे मतभेद आणि गैरसमज आज दूर होणार आहेत. वरिष्ठांचं सहकार्य तुम्हाला मिळणार आहे. आज तुमच्या कामाचं चीज होणार आहे. 


सिंह- जोडीदाराच्या मदतीनं आज तुम्ही एक मोठा टप्पा ओलांडणार आहात. आयुष्याच्या सुखद पर्वाची आजपासून सुरुवात होणार आहे. पाय जमिनीवरच राहू द्या. 


कन्या- आवडीचे पदार्थ खाण्याचा आणि इतरांना खाऊ घालण्याचा आज दिवस आहे. कोणत्यागी गोष्टीची अती चिंता बरी नाही. वर्तमानात जगा. 


तुळ- नोकरीच्या शोधात असणाऱ्यांचा शोध आज अखेर संपणाकर आहे. उष्णतेचा त्रास होईल. जुने मित्र भेटतील. 


वृश्चिक - अती राग करु नका. परिस्थितीचा सारासार विचार करुन निर्णय घ्या. मोठ्यांचा सल्ला आणि त्यांचे आशीर्वाद आज तुम्हाला नव्या वाटेवर नेणार आहेत. त्यांची साथ सोडू नका. 


धनु- तरुणांनी नव्या वादांमध्ये न अडकलेलं बरं. नव्या घराचा विचार कराल. ते खरेदी करण्याचाही विचार कराल. आर्थिक पाठबळ मिळाल्यामुळं मोठा दिलासा असेल. 


मकर - आपल्या लोकांची साथ मिळेल. वडिलांचा सल्ला आज तुम्हाला मोठं यश देणार आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा. 


कुंभ- धनलाभाचा योग आहे. नोकरीमध्ये आजचा दिवस बरंच यश आणणारा ठरेल. वरिष्ठांकडून शाबासकीची थाप मिळेल. कामातून वेळ काढून स्वत:लाही वेळ द्या. 


मीन- नवी आणि जास्त पगाराची नोकरी आज तुमच्या वाट्याला येणार आहे. संधी ओळखा, तिचं सोनं करा. वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवा.