मेष- काही नवे अनुभव मिळतील. अडचणींवर तोडगा काढण्याचे प्रयत्न यशस्वी ठरतील. स्पष्टपणे मतं मांडण्याचा प्रयत्न करा. सोबतच इतरांचं म्हणणंही लक्षपूर्वक ऐका. प्रत्येक व्यक्ती आणि कृतीततून खूप काही शिकण्याचा प्रयत्न करा. कौटुंबीक संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- चांगली वेळ सुरु आहे. आर्थिक व्यवहारांवर लक्ष द्या. कोणत्याही आव्हानासाठी तयार राहा. तुम्ही आज कोणा एका व्यक्तीला अतिशय महत्त्वाचा सल्लाय द्याल. 


मिथुन- स्वत: आखलेल्या योजनांवर लक्ष द्या. पैशांच्या बाबतील चांगले प्रस्ताव समोर येतील पण, त्यांचा गांभीर्याने विचार करा. जमीनीच्या कामांमध्ये फायदा होईल. महिलांसाठी चांगला दिवस. धनलाभ संभाव्य. 


कर्क- इतरांशी चांगलं नातं प्रस्थापित कराल. करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील. कामाच्या ठिकाणासंबंधी मोठी माहिती मिळेल. जबाबदाऱ्यावर लक्ष द्याल. जवळच्या व्यक्तींशी असणारं नातं सुरधारेल. व्यापारामध्ये प्रगती आहे. 


सिंह- आपल्या क्षेत्रा इतरांपेक्षा पुढे जाण्याचा आनंद तुम्हाला लाभेल. व्यग्र असाल तरीही कुटुंबाशी संपर्कात राहा. कामाच्या ठिकाणी आणि करिअरशी निगडीत बऱ्याच उपयोगी गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. ज्यामुळे जादाची आर्थिक कमाई संभाव्य आहे. शुभकार्यात सहभागी व्हाल. 


कन्या- चांगले दिवस सुरु आहेत. आर्थिक अडचण संपेल. कोणा एका खास व्यक्तीचा सल्ला लाभेल. कामाच्या ठिकाणी बरेच सक्रिय राहाल. विश्वासू व्यक्तीशी मनातील गोष्टी शेअर करु शकाल. काही समस्यांवरही तोडगा निघेल. वयोवृद्ध व्यक्तीची मदत कराल. अनेक कामं पूर्णत्वास जाण्याचा योग आहे. 


तुळ- कोणा एका कामामुळे तुम्ही उत्साही असाल. नवीन अनुभव मिळतील. काही मोठ्या व्यक्तींशी भेट होईल, ज्यांची मदत करिअरच्या पुढच्या वाटचालीसाठी होईल. व्यापाराच्या बाबतील काही महत्त्वाचे निर्णय, करार करु इच्छित असाल तर आजचा दिवस चांगला आहे. इतरांना तुमचं म्हणणं पटवून द्याल. धार्मिक कार्यांमध्ये रस दाखवाल. 


वृश्चिक- काही गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने उमगण्यास तुम्हाला मदत मिळेल. नवी माहिती मिळेल. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे. एकट्यानेच सर्व कामं पूर्णत्वास नेण्याचा विचार तुमच्या मनात येईल. तुमच्या कामाने इतर बरेचजण प्रभावित होतील. आर्थिक व्यवहारात नव्या संधी मिळतील. चांगला काळ सुरू आहे. 


धनू- अनेक गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी मिळेल. नवी माहिती मिळेल. तुमच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असेल. आत्मविश्वास जास्त असेल. वादाच्या परिस्थितीमध्येही यश तुमच्याच पदरात आहे. 


मकर- संधी मिळाल्यास थोडी विश्रांती घ्या. कोणत्या एका खास गोष्टीसाठी काम करत असाल तर आर्थिक स्थिती सुधारेल. वैयक्तिक अडचणींवर तोडगा निघेल. थोडा विचार करत आणि चर्चा करत निर्णय घेतला तर फायदा. नव्या गोष्टींची सुरुवात करण्यासाठीचा चांगला दिवस. व्यापारातही सफलता मिळेल. 


कुंभ- न्यायालयीन प्रकरणात चांगली बातमी ऐकण्यास मिळेल. मित्रमंडळींसोबत कामकाजाचे बेत आखाल. लवकरच तुम्हाला प्रवासाचा योग आहे. जुन्या गुंतवणूकीचा फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होणार. व्यापारातही यश मिळेल. 


मीन- स्पष्टपणे तुमची मतं मांडा. कामाच्या, व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या मताला दुजोरा देत अनेकजणांचं एकमत असेल. प्रयत्न केल्यास कोणा एका खास व्यक्तीला प्रभावित करु शकाल. कोणाशी अचानक झालेली भेट पुढे जाऊन प्रेमसंबंधांमध्ये बदलू शकते. आत्मविश्वास वाढेल. 


-दीपक शुक्ला