राशीभविष्य | शुक्रवार | १ मार्च २०१९
असा असेल तुमचा आजचा दिवस
मेष - नवीन लोकांशी ओळखी होतील. अनेक लोकांची मदत होऊ शकते. तुम्हाला सहानुभूती दाखवली जाईल. आज अधिक संवेदनशील होऊ शकता. प्रेम तसेच वैवाहिक संबंधांत सुधारणा होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांची मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी नवे काम मिळू शकते. सामाजिक कार्यात भाग घ्याल.
वृषभ - नोकरदार वर्गातील लोकांच्या स्थितीत सुधारणा होईल. मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. पुढे जाण्यासाठी नव्या संधी तसेच ऑफर मिळू शकतात. तुम्ही कामाचे जितके टेंशन घेत आहात तितकी समस्या नसणार. आज महत्त्वाची कामे उरकून घ्या. नशीबाची साथ मिळेल. जे काम कराल त्याचे चांगले परिणाम दिसणार आहेत. आसपासच्या तसेच कामाच्या ठिकाणी लोकांवर तुमचा प्रभाव राहील. वैयक्तिक जीवन तसेच करियरमध्ये प्रगतीसाठी संधी मिळणार आहे.
मिथुन - आज विचार करून निर्णय घ्या. आपल्या विचारांचा दुसऱ्यांवर प्रभाव पाडण्यास यशस्वी होऊ शकता. नव्या जागी जाण्याचा योग आहे. नवीन लोकांशी भेटी होऊ शकतात. यातून फायदा होऊ शकतो. तुम्ही जितकी मेहनत कराल तितकेच यशही मिळेल. बेराजगारांना रोजगार मिळण्याच्या संधी आहेत.
कर्क - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. उत्साह वाढेल. घर आणि आसपासच्या वस्तूंचा कंट्रोल तुमच्याजवळ असेल. पैशांसंबंधी थोडा विचार केला तरच फायदा आहे. राहिलेले पैसे मिळण्याचा योग आहे. खर्च आणि पैशाविषयी प्रकरणांत अधिक लक्ष द्या. मोठे निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला आहे. एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे नियोजन होऊ शकते.
सिंह - मोठी कामे मार्गी लावण्यात आज संपूर्ण लक्ष असेल. अनेक कामे वेळेत पूर्ण होऊ शकतात. काही नवीन अनुभव मिळू शकतात. आज संपूर्ण वेळ व्यस्त आणि सक्रीय असाल. साथीदारासोबत संबंधांत सुधारणा होतील.
कन्या - जे काम करणार आहात किंवा ज्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात आली आहे त्याचा आनंदाने स्वीकार करा. संपूर्ण काम सहजतेने पूर्ण करू शकता. तुमच्या कामाने दुसऱ्यांनाही प्रेरणा मिळू शकते. पैशाच्या स्थितीत सुधारणा होऊ शकते. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. काही नवीन गोष्टी शिकाल. ऑफिस किंवा घरात काही नवीन बदल होण्याचे योग आहेत.
तुळ - आज आनंदी राहण्यचा प्रयत्न कराल. जे लोक तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे खोटेही तुम्हाला समजू शकते. तुमच्या भावना सांगण्याचा प्रयत्न कराल तर साथीदार तुमच्या मनातील गोष्ट समजू शकेल. मित्र, कुटुंबिय तसेच साथीदारासोबत व्यतित केलेला वेळ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो. एखाद्या खास व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
वृश्चिक - चांगल्या लोकांशी भेट होऊ शकते. ज्यातून तुम्हाला फायदा हाईल. मित्रांसोबत वेळ घालवाल. आज केलेल्या व्यवसायातील डील फायदेशीर ठरू शकतात. कुटुंबातील जबाबदाऱ्यांवर लक्ष द्या. व्यवसाय उत्तम राहील. घरातील वातावरण चांगले राहील तसेच कुटुंबियांची मदतही मिळेल.
धनु - इंटरव्यू किंवा लग्नाविषयी केलेली चर्चा तुमच्यासाठी चांगली ठरेल. कुटुंबातील किंवा मित्रांमध्ये काही गोष्टी बाकी असल्यास त्यावर चर्चा होऊ शकते. यातून मार्ग निघण्याचे योग आहेत. कामात यशस्वी व्हाल. मुलांविषयी काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
मकर - छोटे प्रवास तसेच काही महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊ शकते. काही खास लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. तुमच्या बुद्धीमत्तेने कठीण काम पूर्ण करू शकता. अधिक मेहनतीचे काम करावे लागू शकते. स्वत:ला पॉझिटिव्ह ठेऊ शकता. पैशांसंबंधी काही समस्या असल्यास त्या दूर होतील. आज चांगली बातमी मिळू शकते.
कुंभ - आज लोकांशी भेटीगाठी करण्यात आणि चर्चा करण्यात यशस्वी व्हाल. आजूबाजूच्या लोकांवर लक्ष ठेवा. ऑफिसमध्ये जबाबदारीचे काम मिळू शकते. मोठे भाऊ तसेच मित्रांकडून मदत मिळू शकते.
मीन - स्वत:वर विश्वास ठेवा आणि काम करत राहा. व्यवसाय तसेच नोकरीत खास कामे पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे. अधिकतर गोष्टीत आज यशस्वी व्हाल. नशीबाची साथ मिळेल. मेहनतीमुळे कामावर तुम्हाला महत्त्व मिळेल, सन्मान वाढेल. पैशांच्या स्थितीत सुधारणा होतील, प्रगतीसाठी चांगल्या संधी मिळतील. तुम्ही आखलेल्या योजनांमध्ये यश मिळेल.