मेष- व्यावसायिकांसाठी ही वेळ चांगली नाही. कोणाला पैसे उधार देऊ नका. जुनं कर्ज तुमच्यासाठी त्रासदायक ठरु शकतं. नोकरदार वर्गापासून सावध राहा. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. खाण्यापिण्याच्या सवयींवर लक्ष ठेवा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- विचाराधीन कामं पूर्ण होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या विचारांमुळे सकारात्मक बदर होतील. साथीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. 


मिथुन- व्यवसायात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. साथीदाराची साथ लाभेल. अडकलेले पैसे परत मिळतील. चांगल्या कामांची संधी मिळेल. आहाराविषयी काळजी घ्या. 


कर्क- कामाच्या ठिकाणी वातावरण चांगलं नसल्यामुळे आज चीडचीड होईल. दैनंदिन कामांमध्ये काही अडचणी असतील. प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या. 


सिंह- आत्मविश्वास वाढलेला असेल. आज तुम्ही इतरांना प्रभावित कराल. एखादी शुभवार्ता मिळेल. सांधेदुखी सतावेल. साथीदार तुमच्या भावना समजून घेईल. 


कन्या- कुटुंबाची मदत मिळेल. मानसिक संतुलन राहील. ज्यामुळे कुटुंबात आनंददायी वातावरण असेल. कामं पूर्णत्वास जातील. चांगल्या संधीही मिळतील. 


तुळ- मेहनतीमुळे तुम्हाला सफलता मिळेल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. बढती मिळण्याची संधी आहे. दिवस चांगल्या पद्धतीने व्यतीत कराल. आज तुमचं आरोग्य सामान्य असेल. 


वृश्चिक- आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. काही कायदेशीर कामांमध्ये अडकाल. खास कामांमध्ये जास्त मेहनतही करावी लागू शकते. काहीसा थकवा जाणवू शकतो. 


धनु- शेअर बाजारात विचारपूर्वक गुंतवणूक कराल. करिअरच्या दृष्टीने महत्त्वाच्या मंडळींपासून थोडे सावध राहा. आज थोडा धीर बाळगा. आरोग्य सर्वसामान्य असेल. 


मकर- नुकसान होण्याची चिन्हं आहेत. दिखाव्यापासून दूर राहा. कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवरुन वाद होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. 


कुंभ- करिअरच्या दृष्टीने एखादी शुभवार्ता मिळेल. शत्रूवर तुमचं वर्चस्व असेल. नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस चांगला आहे. अडकलेली कामं पूर्ण होतील. 


मीन- करिअरच्या दृष्टीने काही महत्त्वाची कामं पूर्ण होतील. विचारपूर्वक गुंतवणूक करा. एखाद्या कामाचा विसर पडेल. प्रेमसंबंधांमध्ये चढ- उतार येतील. आरोग्याची काळजी घ्या.