आजचे राशीभविष्य | बुधवार | ११ सप्टेंबर २०१९
जाणून घ्या कसा आहे, तुमचा आजचा दिवस
मेष- कोणती एक गोष्ट निकाली काढण्याचा प्रयत्न करणार असाल, तर शांत राहा, धीराने काम करा. सर्वकाही सुरळीत होईल. नोकरीच्या ठिकाणी साचेबद्ध कामातून बाहेर याल, तेव्हाच यश मिळेल. कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करण्याला प्राधान्य द्यायचा प्रयत्न कराल.
वृषभ- तुमच्या मतांचा इतरांवर प्रभाव पडेल. नोकरीच्या ठिकाणी कनिष्ठांची अडचण होईल. अडकलेली कामं पूर्णत्वास जातील. विचार करण्याचा प्रयत्न कराल. विचार करण्याची पद्धत बदललेली असेल. वेळीच मित्रांची मदतही होईल.
मिथुन- दैनंदिन कामं आटोपण्यासाठी जास्त प्रयत्न कराल. जबाबदारीवर लक्ष ठेवा. आज याची जास्त गरज आहे. वेळेचा पूर्ण वापर करा. मन शांत ठेवा. सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा.
कर्क- पैसे कमावण्याच्या बाबतीत यश मिळेल. जास्तीच्या कामात इतरांची मदत मिळेल. जुन्या मुद्द्यांवर मतभेद होऊ शकतात. तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळेल. एखाद्या चांगल्या बातमीच्या प्रतिक्षेत असाल.
सिंह- बेरोजगारांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायातही यश मिळेल. एखाद्या मोठ्या निर्णयामुळे भावनाविवश व्हाल. नवं काम सुरु करण्याचा प्रयत्न कराल. वायफळ खर्च वाढतील.
कन्या- दिवस चांगला आहे. फक्त भावनांवर नियंत्रण ठेवा. प्रेम व्यक्त करण्यासाठी चांगला दिवस आहे. कोणा एका व्यक्तीच्या मानसिक आधारामुळे परिस्थिती सुधारेल.
तुळ- तुमची परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न कराल. चांगल्या व्यवहारामुळे अनेकांचीच मदत मिळेल. अडकलेली कामं पूर्ण होण्याची संभावना आहे. धार्मिक यात्रेवर जाण्याचा योग आहे.
वृश्चिक- अगदी सोप्या पद्धतीने कामं पूर्ण होतील. साथीदाराची मदत मिळेल. हाताशी बरंच काम असेल. इतरांशी विनम्रतेने संवाद साधा. कायदेसीर कामांमध्ये काळजी घ्या.
धनु- बऱ्याच काळापासून ज्या कामाची आखणी करत आहात, ती कामं पूर्ण होतील. नव्या ठिकाणी जाण्याचा बेत आखाल. इतरांच्या स्वभावाचा सहज अंदाज लावाल.
मकर- बेरोजगारांना नोकरी मिळेल. महत्त्वाच्या लोकांची मदत मिळेल. कोणतंही मोठं पाऊल उचलण्यापूर्वी परिस्तितीचा विचार करा. प्रय़त्न केल्यास अडकेले पैसे परत मिळतील,
कुंभ- दिवस सर्वसामान्य आहे. अडचणींपासून स्वत:ला दूर ठेवा. कोणा एका व्यक्तीची मदत मिळेल. आर्थिक बाबातीत सुधारणा होईल. एखादी शुभवार्ता मिळेल.
मीन- दैनंदिन कामं पूर्ण होतील. अडचणी दूर होतील. काही कामांच्या पद्धतींमध्ये बदल करण्याचा प्रयत्न कराल. आज बऱ्यापैकी व्यग्र असाल.